कान हाच तुमचा पासवर्ड! 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

एका नव्या आयडेंटिफिकेशन सिस्टिममध्ये तुमचा कान हाच तुमचा पासवर्ड असेल! आपल्या कानातील पोकळीत होणाऱ्या आवाजाच्या कंपनांमध्ये (रेझोनेशन ऑफ साऊंड) असलेल्या 
फरकामुळे व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी कानाचा उपयोग होऊ शकतो. एनईसी कॉर्पोरेशनने ही इयरबड टेक्‍नॉलॉजी विकसित केली असून, यात नव्व्याण्णव टक्के अचूकता 
आहे. यासाठी स्कॅनिंगची आवश्‍यकता नाही. आवाजाची कंपने मोजू शकणारा मायक्रोफोन असलेल्या इअरफोनच्या मदतीने हे काम होऊ शकेल. त्यामुळे चालता-चालता किंवा 

काही काम करत असतानाही व्यक्तीची ओळख पटवणे शक्‍य होणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कानातील पोकळीचा आकार हा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा असतो. त्यामुळे या पोकळीत निर्माण होणारी कंपने वेगवेगळी असतात. या सिस्टिमच्या मदतीने अगदी एका सेकंदात ही कंपने मोजून व्यक्तीची ओळख पटवता येईल. ही सिस्टिम काही हजार मिलिसेंकदांच्या आवाजाच्या लहरी इयरफोन पाठवेल आणि मायक्रोफोन या लहरी शोषून घेईल. आजूबाजूच्या गोंधळाची स्थिती लक्षात घेऊन कानातील पोकळीतील अचूक कंपने परत सिस्टिमला पाठवेल. शरीराचा कोणताही भाग स्कॅन करावा लागत नसल्याने, तसेच वेगळा वेळ द्यावा लागत नसल्याने ही बायोमेट्रिक सिस्टिम सर्वत्र वापरता येऊ शकते. 
 
Web Title: Now Ear your password