jio New Plan : इंटरनेटप्रेमींसाठी Jio चा भन्नाट प्लान; वर्षभराची व्हॅलिडिटी अन् भरपूर ऑफर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jio

jio New Plan : इंटरनेटप्रेमींसाठी Jio चा भन्नाट प्लान; वर्षभराची व्हॅलिडिटी अन् भरपूर ऑफर्स

Jio New Plan Offers : यंदाच्या दिवाळीत कोणत्याही टेलिकॉम कंपनीने कोणतीही मोठी ऑफर जाहीर केलेली नाही. मात्र, आता जिओ (Jio), जिओ फायबर आणि व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea) ग्राहकांसाठी काही भन्नाट ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा: Airtel ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मोबाईल रिचार्ज अन् बिलवर मिळतेय २५ टक्के सूट

या ऑफर अंतर्गत यूजर्सना 75GB अतिरिक्त डेटासह अन्य ऑफर्सचाही लाभ घेता येणार आहे. Jio च्या या ऑफरसाठी ग्राहकांना केवळ एक रिचार्ज करायचे आहे. रिचार्ज केल्यानंतर युजर्सला एक वर्षाची व्हॅलिडिटी, एसएमएस आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय युजर्स डिसकाउंट कूपन आणि अतिरिक्त डेटा (Internet Deta) यांसारखे लाभदेखील घेता येणार आहे.

हेही वाचा: Reliance Jio: BSNLला मागे टाकत रिलायन्स जिओ टॉप! बनली सर्वात मोठी वायरलाइन कंपनी

असा आहे रिचार्ज प्लान

जिओचा हा रिचार्ज प्लॅन २९९९ रुपयांचा असून, या प्लानमध्ये यूजर्सला एक वर्षाची व्हॅलिडिटी देण्या आली आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच संपूर्ण प्लानमध्ये एकूण 912.5GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लानमध्ये युजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचाही लाभ घेता येणार आहे. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चा मोफत लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा: WhatsApp : प्रत्येक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे ? मग इंटरनेट पॅकचा फायदा काय ?

जिओच्या या प्लानचे रिचार्ज केल्यानंतर युजर्सना 299 रुपयांचा Zoomin- Mini Magnet चा सेट मोफत दिला जाणार आहे. तथापि, यासाठी युजर्सना कर आणि शिपिंग शुल्क भरावे लागेल.

वरील ऑफर्ससह युजर्सना Ferns & Petals कडून 799 रुपयांच्या खरेदीवर 150 रुपयांची सूट मिळेल. तर, Ajio कडून 2990 रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर 1000 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय अर्बन लॅडरमधून 45 हजार रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

हेही वाचा: Internet : इंटरनेट डेटा मिळणार आता उधार; 'या' कंपनीचं कार्ड तुमच्याकडे आहे का?

दुसरीकडे, रिलायन्स डिजिटलचे 1000 रुपयांचे कूपन 500-500 रुपयांचे दोन कूपन युजर्सना उपलब्ध असतील. अशा प्रकारे, युजर्सना एकूण 3699 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल.