Aadhaar Card Fraud | फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aadhaar card

Aadhaar Card Fraud | फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Aadhaar Card Fraud : आधार (Aadhaar) हे सध्याच्या युगातील सर्वात आवश्यक दस्तऐवज आहे, हे तुम्हाला खाजगी ते सरकारी कार्यालयांपर्यंत सर्वत्र गरजेचे बनले आहे. अशी काही ठिकाणे आहेत जिथे सर्व कामे ही आधार कार्डच्या युनिक नंबरनेच होतात. त्यामुळेच आधार कार्डचा सर्वत्र वापर होत आहे. त्यासोबतच परीणामी आधार कार्ड वापरुन फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर आधार कार्ड वापरुन होणारी फसवणूक टाळता येऊ शकते.

mAadhaar चा वापर करा

  • आधार कार्ड वापरुन होणारी फसवणूक टाळण्यासाठी mAadhaar अॅपचा वापर करणे सुरु करा. तुम्ही Google Play Store वरून mAadhaar अॅप डाउनलोड केले जाऊ शकते.

  • mAadhaar अॅप Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करा. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी व्हेरिफिकेशन केल्यानंतर mAadhaar ओपन होईल.

  • यानंतर तुम्हाला mAadhaar नोंदणीचा ​​ऑप्शन मिळेल, ज्यासाठी तुम्हाला 4-अंकी पिन सेट करावा लागेल.

  • त्यानंतर 12 अंकी आधार, सुरक्षा कोड कॅप्चा सबमिट करावा लागेल. यानंतर तुमचा आधार नोंदणी होईल.

  • आधार आणि बायोमेट्रिक कसे लॉक करावे

  • mAadhaar पेजच्या तळाशी तीन पर्याय दिले जातील. यापैकी एक व्हर्च्युअल आयडीचा पर्याय असेल. ते बायोमेट्रिक लॉक आणि आधार लॉक करण्यापूर्वी बनवावे लागेल.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

व्हर्च्युअल आयडी कसा तयार करावा

  • पहिल्यांदा तुम्हाला व्हर्च्युअल आयडी (Aadhaar Virtua ID) पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक आणि सुरक्षा कॅप्चा कोड एंटर करावा लागेल.

  • त्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचा व्हर्च्युअल आयडी तयार होईल.

  • वापरकर्त्यांना हा व्हर्च्युअल आयडी लक्षात ठेवावा लागेल.

बायोमेट्रिक आणि आधार लॉक कसे करावे

व्हर्च्युअल आयडी सबमिट करून आधार लॉक केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आधार हे बायोमेट्रिक पद्धतीने लॉक केले जाऊ शकते. दोन्ही प्रकारच्या लॉकसाठी, तुम्हाला मोबाइल नंबर व्हेरिफीकेशनसाठी OTP प्रक्रिया फॉलो करावी लागेल.

हेही वाचा: Maruti Baleno लवकरच येतेय नव्या अवतारात; काय असतील फीचर्स?

loading image
go to top