esakal | ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पुन्हा सुरु; पाहा बुकिंग प्रोसेस
sakal

बोलून बातमी शोधा

ओला इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री पुन्हा सुरु; पाहा बुकिंग प्रोसेस

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी S1 श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ही विक्री सुरू होणार होती, पण काही तांत्रिक अडचणींमुळे कंपनीला 15 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवावी लागली होती. दरम्यान ओला इलेक्ट्रिकने आपल्या ई-स्कूटरचे दोन प्रकार-S 1 आणि हाय-एंड S 1 Pro लाँच केले आहेत. ओला S1 ची किंमत 99,999 रुपये आहे, तर S 1 Proची किंमत 1,29,999 रुपये आहे. FAME II सबसिडी आणि राज्य सबसिडी वगळता हे एक्स-शोरूम किंमती आहेत. याचा अर्थ तुम्ही ज्या राज्यात ई-स्कूटर खरेदी करता त्यानुसार हे दर बदलू शकतात.

कसे खरेदी करावे

ओला इलेक्ट्रिक स्कूटर हे डीलरशिपवर उपलब्ध नाहीत, म्हणून आपण ते ऑनलाइन खरेदी करू शकता. हे बुक करण्यासाठी, खरेदीदारांना 499 रुपयांची टोकन रक्कम भरावी लागेल. हे स्कूटर 8 सप्टेंबरपासून खरेदी खरेदी करता, त्यामुळे ग्राहक उरलेली रक्कम भरून आणि कलर ऑप्शन फायनल करुन लगेच खरेदी करू शकतात.

डिलीव्हरी कशी मिळेल

एकदा आपल्या खरेदीची कन्फर्म झाल्यावर, कंपनी खरेदीदारास त्याबद्दल अपडेट करेल आणि वेटींग लिस्टमध्ये ठेवेल. यानंतर, तुमच्या नंबर आल्यावर तुम्हाला हे स्कुटर डिलिव्हर केले जाईल. ही डिलीव्हरी ऑगस्टमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: iPhone 13 सीरीज नंतर स्वस्त झाले iPhone 11, iPhone 12

ओला एस 1 चे फीचर्स

ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 3.9 3.9 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आले आहे, जे 11 बीएचपी इलेक्ट्रिक मोटरला पावर देते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड्स नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर देण्यात आले आहेत. चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, रेग्युलर एसी चार्जरने 6 तासात बॅटरी चार्ज करता येते. तसेच हे स्कुटर 115 किमी प्रतितासाच्या स्पीडने चालवले जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तीन राइडिंग मोड्स नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर दिले आहेत. हे रिव्हर्स गियर, सेगमेंट-बेस्ट अंडर-सीट स्टोरेज, नेव्हिगेशन आणि क्रूझ कंट्रोल सारख्या फीचरसह येते.

हेही वाचा: MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

loading image
go to top