
One Plus : one plus 11 ची वाट बघताय ? काय असेल किंमत आणि फीचर आधीच जाणून घ्या
One Plus : OnePlus कंपनी लवकरच ग्लोबल लेव्हलवर OnePlus 11 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. क्लाउड 11 लॉन्च इव्हेंट 7 फेब्रुवारीला होणार आहे आणि याच इव्हेंट मध्ये हा फोन लॉन्च केला जाईल. हा फ्लॅगशिप फोन भारताव्यतिरिक्त नॉर्थ अमेरिका, युरोप (जर्मनी सोडून) आशिया आणि इतर देशांमध्ये विकला जाईल.
OnePlus 11 Specifications
Amazon US ने OnePlus 11 ला लिस्ट केला होता. पण नंतर त्यांनी लगेचच ही लिस्टिंग वेबसाईट्वरुन काढून टाकली. पण बऱ्याच लोकांनी याचे स्क्रीनशॉट घेतले आहेत. फोनच्या फीचर्सचे डिटेलिंग देखील यात देण्यात आलेत. यूएसमध्ये लाँच करण्यात येणाऱ्या OnePlus 11 मध्ये 80W चार्जिंग सपोर्ट मिळेल तर अमेरीका सोडून इतर मार्केटमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या चार्जिंग सपोर्टमुळे 5000mAh बॅटरी केवळ 25 मिनिटांत चार्ज होईल.
OnePlus 11 Launch Date
नॉर्थ अमेरिकेत लाँच होणाऱ्या फोनमध्ये 16GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मिळेल. तर इतर मार्केटमध्ये हा फोन 512GB स्टोरेजसह उपलब्ध असणार आहे. फोनच लॉन्चिंग 7 फेब्रुवारीला असलं तरी त्याच दिवसापासून फोन प्री-ऑर्डर करता येतील.
OnePlus 11 Price In India
एका रिपोर्टनुसार, भारतात OnePlus 11 ची किंमत 79,960 रुपये इतकी असणार आहे. युरोपमध्ये विकण्यात येणाऱ्या या व्हेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असेल. तर टॉप व्हेरिएंट मध्ये 16GB RAM + 256GB स्टोरेज असेल आणि याची किंमत 84,407 रुपये इतकी असेल.