OnePlus 10 Pro : सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus चा नवा स्मार्टफोन लॉंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 OnePlus 10 Pro

सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह OnePlus चा नवा स्मार्टफोन लॉंच

OnePlus ने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10 Pro लॉन्च केला आहे. हा फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus 9 Pro स्मार्टफोनचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. वनप्लसच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा तसेच Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आले आहे. OnePlus 10 Pro चीनमध्ये लॉन्च झाला असून कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या ग्लोबल लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही.

किंमत किती आहे?

OnePlus 10 Pro स्मार्टफोनची किंमत 4,699 युआन (सुमारे 54,500 रुपये) पासून सुरु होत आहे. ही किंमत फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटसाठी आहे. फोनच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 4,999 युआन (सुमारे 58,000 रुपये) आहे. तर OnePlus 10 Pro च्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत 5,299 युआन (सुमारे 61,500 रुपये) आहे. OnePlus चा हा स्मार्टफोन एमराल्ड फॉरेस्ट आणि व्होल्कॅनिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये 13 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स काय आहेत?

OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाची सेकंड-जनरेशन LTPO Amoled डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो (1Hz ते 120 Hz पर्यंत). या कर्व्ह्ड पॅनेलचे रिझोल्यूशन 3216 x 1440 पिक्सेल आहे. फोनच्या वरच्या बाजूला डाव्या कोपर्‍यात एक पंच-होल आहे. तसेच, फोनमध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आले आहे. वनप्लसच्या या नवीन स्मार्टफोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण देण्यात आले आहे.

हेही वाचा: Jio युजर्ससाठी UPI ऑटोपे फीचर; आपोआप होईल रीचार्ज, असे करा सेट

मिळेल 48MP कॅमेरा

OnePlus 10 Pro मध्ये स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागील बाजूस मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेंसर देण्यात आला आहे. फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.

फोनवरून दुसरा स्मार्टफोन चार्ज करता येईस

OnePlus 10 Pro स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 80W SuperVOOC फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या OnePlus फोनद्वारे तुम्ही इतर कोणताही स्मार्टफोन चार्ज करू शकता. म्हणजेच फोनमध्ये रिव्हर्स वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. फोनचे वजन 200 ग्रॅम आहे.

हेही वाचा: टाटा नेक्सॉन पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोणती कार ठरेल बेस्ट, समजून घ्या

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :OnePlus
loading image
go to top