OnePlus 10 Pro आज भारतात होणार लॉन्च; लाइव स्‍ट्रीम, फीचर्स, किंमत जाणून घ्या

OnePlus 10 Pro launch news, oneplus 10 pro features
OnePlus 10 Pro launch news, oneplus 10 pro features
Updated on

OnePlus 10 Pro स्‍मार्टफोन आज भारतामध्ये लॉन्‍च होणार आहे. कंपनीने हा फोन जानेवारीत चीनमध्ये लॉन्च केले आहे. या स्मार्ट फोनमध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा आणि ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर अनेक फिचर्स आहे. (Oneplus 10 pro features)

OnePlus 10 Pro सोबत आज OnePlus Bullets Wireless Z2 देखील भारतात पदार्पण करत आहेत. नेकबॅन्ड-स्टाइलचे इयरबड, OnePlus Bullets Wireless Z हे सक्सेसर ठरणार आहेत. त्याशिवाय OnePlus Buds Pro रेडिएंट सिल्वर कलर व्हेरिएंट आजच्या इव्हेंटमध्ये कार्यक्रम लॉन्च होत आहे. (OnePlus 10 Pro to launch in India today Find out the live stream, features, price)

OnePlus 10 Pro launch news, oneplus 10 pro features
रेडमीचे तीन नवे स्वस्तात मस्त 5G फोन लॉंच; पाहा किंमती अन् फीचर्स

OnePlus 10 Pro चा भारतात लॉन्चचे होणार लाईव्हस्ट्रीम

देशात OnePlus 10 Pro लॉन्चिंग आज रात्री ७.३० वाजता सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये ट्विटर, यूट्यूब आणि वनप्लस, सोशल मीडिया चॅनलने लाईव्हस्ट्रीम केले जाणार आहे. भारतासह OnePlus 10 Pro चे जागतिक पातळीवर देखील आज लॉन्च होऊ शकतो.

OnePlus 10 Pro ची भारतातील अंदाजे किंमत (OnePlus 10 Pro Price)

भारतातOnePlus 10 Pro ची किंमत 66,999 रुपयांपासून सूरुवात होणार आहे जी 71999 रुपयांपर्यंत वाढू शकते. फोनला ५ एप्रिलपासून विक्रीसाठी उपल्बध असणार आहे.

OnePlus 10 Pro launch news, oneplus 10 pro features
Google Pay ने लाँच केलं टॅप टू पे फीचर; पेमेंट करणं होईल आणखी सोप्पं

OnePlus 10 Pro चे स्‍पे‍सिफि‍केशंस

भारतीय आणि जागतिक बाजारामध्ये येणाऱ्या OnePlus 10 Pro मध्ये तेच स्पेसिफिकेशन असणार आहे जे यावर्षीच्या सुरूवातीला चीनमध्ये आलेल्या डिव्हाईसमध्ये आहे. फोनमध्ये 6.7 इंचाचा QHD+ (1,440x3,216 पिक्सल) कर्व्ड LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले मिळू शकतो जो120Hz के डायनॅमिक रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसरपासून पावर्ड केलेला आहे ज्यामध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम उपलब्ध आहे.

OnePlus 10 Pro ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसोबत मिळतो त्यामध्ये f/1.8 लेन्ससोबत 48 मेगापिक्सलचा Sony IMX789 प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलचा Samsung ISOCELL JN1 सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो शूटर देखील उपलब्ध आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा आहे.

OnePlus 10 Pro launch news, oneplus 10 pro features
Appleच्या चाहत्यांना झटका! कंपनी आता 'हे' iPhones दुरुस्त करणार नाही कारण..

फोनमध्ये 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज उपल्बध आहे. कनेक्टिविटी ऑपन्शसची पूर्ण सीरीज आगे ज्यामध्ये 5G, वाय-फाय 6 आणि NFC समाविष्ट आहे. OnePlus 10 Pro मध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी,80Wच्या वायर्ड आणि 50W चार्जिंगला सपोर्ट करते आहे. डिव्हाईसचे वजन 200.5 ग्रॅम आहे.

OnePlus Bullets Wireless Z2 चे स्‍पेसिफ‍िकेशंस

हे 12.4mm ड्रायव्हर्ससह पदार्पण (debut) करेल. कंपनीच्या टीझरमध्ये असे म्हटले आहे की,हे इअरबड्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 20 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देऊ शकते. इअरबड्स पाणी आणि स्वेट-रेसिस्टेंट असल्याचा दावा केला जातो. त्याला IP55 प्रमाणपत्र मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com