
Whatsapp Location Track Risk : आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअॅप हे संपूर्ण जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे चॅटिंग व कॉलिंग अॅप बनले आहे. आपण परिवार, मित्र-मैत्रिणींशी किंवा ऑफिस कॉल्ससाठी याचा वापर करत असतो. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या माध्यमातून तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅप कॉल्स हे peer-to-peer कनेक्शनवर आधारित असतात. म्हणजेच कॉल करताना तुमचे डिव्हाइस थेट समोरच्या व्यक्तीशी कनेक्ट होते. अशा वेळी, जर कॉल करणारा एखादा हॅकर किंवा फसवणूक करणारा असेल तर तो तांत्रिक पद्धतीने तुमचा IP अॅड्रेस मिळवू शकतो. आणि या IP अॅड्रेसवरून तुमचे अंदाजे लोकेशन, नेटवर्क व इतर माहिती सहजपणे कळू शकते.
या धोक्यापासून बचाव करण्यासाठी WhatsApp ने एक खास सुरक्षा फीचर उपलब्ध करून दिले आहे. ते म्हणजे “Protect IP address in calls”. हे फीचर ऑन केल्यास तुमचा IP अॅड्रेस कोणालाही दिसणार नाही आणि तुमची गोपनीयता सुरक्षित राहील.
WhatsApp उघडा
वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करा
Settings > Privacy > Advanced मध्ये जा
Protect IP address in calls हा पर्याय सुरू करा
अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स उचलू नका
ओळख नसलेल्या लिंक्स, फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक करणे टाळा
‘ब्लर फोटो स्कॅम’ पासून सावध रहा. हे फोटो तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात
तुमच्या डिजिटल आयुष्यातील सुरक्षितता तुमच्या हातात आहे. खबरदारीचे पावले उचलून तुम्ही मोठ्या सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करू शकता. व्हॉट्सअॅपवरील ‘Protect IP’ फीचर लगेच अॅक्टिव्ह करा आणि सुरक्षित रहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.