नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, One Plus च्या 'या' फोनवर Discount | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

one plus

वन प्लसच्या (OnePlus) सर्वात महागड्या फोनवर अॅमेझॉनने आतापर्यंतचा सर्वात मस्त ऑफर आहे. वनप्लस फोनवर बहुतांश सूट कमी राहते, मात्र या ऑफरवर थेट 15 हजारांची सूट मिळतेय.

नवा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, One Plus च्या 'या' फोनवर Discount

जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉनची (Amazon)ऑफर मिस करु नका. उत्तम दर्जाच्या या फोनमध्ये सर्व फीचर्स नंबर एक तसेच 5G नेटवर्क आहे. या फोनवर पहिल्यांदाच १५ हजार कॅश डिस्काउंट आणि १८ हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे.

OnePlus 9 Pro 5G (Pine Green, 8GB RAM, 128GB Storage)

वनप्लस (OnePlus) 9 सीरीजच्या महागड्या फोन्समध्ये OnePlus 9 Pro 5G चा देखील समावेश आहे, ज्याची किंमत 64,999 आहे. हा फोन पाच हजार रुपये कमी आल्यानंतर 59,999 रुपयात खरेदी करू शकता. या ऑफरनंतर CITIच्या कार्डवरून पेमेंट केल्यावर इन्स्टंट 10 हजार डिस्काऊंट दिला जात आहे. या फोनवर १८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे. या फोनवर No Cost EMI चा पर्यायही आहे.

हेही वाचा: ONE PLUS चे जगातील सर्वात मोठे शोरूम बेंगलोर मध्ये उघडणार

OnePlus 9 Pro 5G चे फीचर्स

- आयफोन आणि सॅमसंगला टक्कर देणाऱ्या या फोनमध्ये सिल्वर, ग्रीन आणि ब्लॅक कलरचा पर्याय मिळत आहे.

- या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB Storage आहे. यात बिल्ट-इन अलेक्सा हे खास फीचर देखील आहे.

- या फोनमध्ये Hasseblad चा विकसित ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यात 48MP चा मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे, यात 1/1.56" आकाराचे सेन्सर्स तसेच 8 MP Telepoto लेन्स आहेत. 2 MP Monochorme कॅमेरा आणि 16 Mp चा सेल्फी कॅमेरा आहे.

- या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर असून Adreno 660 GPU आहे.

- Fluid AMOLED डिस्प्ले असलेल्या फोनची स्क्रीन साइज 6.7 इंच असून यात लेटेस्ट LTPO टेक्नॉलॉजी आहे

- फोनमध्ये अँड्रॉयड 11 बेस्ड ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम असून 65 वॉट वार्प चार्जिंगसह 4500 mAh बॅटरी तसेच 50W ची वायरलेस चार्जिंग क्षमता आहे.

Web Title: Oneplus 9 Pro 5g Phone Price Best Camera Phone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mobileAmazonphoneOnePlus
go to top