OnePlus चा परवडणारा फोन भारतात लॉंच, मिळेल 8GB रॅम अन् बरंच काही

oneplus affordable smartphone oneplus nord ce 2 5g launched in india check price and details
oneplus affordable smartphone oneplus nord ce 2 5g launched in india check price and details

OnePlus प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कंपनीने आज भारतात आपला सर्वात परवडणारा स्मार्टफोन (Oneplus Most Affordable Smartphone) OnePlus Nord CE 2 5G लॉन्च केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या OnePlus Nord CE 5G चा सक्सेसर म्हणून सादर करण्यात आला आहे. कंपनीने स्मार्टफोनसोबत OnePlus TV Y1S सीरीज देखील लॉन्च केली आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल…

OnePlus Nord CE 2 5G चे स्पेसिफिकेशन्स

- Dual-SIM (Nano) सपोर्टसह येणारा OnePlus Nord CE 2 5G फोन Android 11 वर चालतो, जो कंपनीच्या OxygenOS 11 वर आधारित आहे. स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंच (1080x2400) फुल-एचडी+ फ्लुइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेची पिक्सेल डेंसिटी 409ppi आहे, आणि HDR10+ सर्टिफिकेशन आणि गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येतो. OnePlus Nord CE 2 5G ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 900 चिपसेट दिला असून ARM Mali-G68 GPU सह, 8GB पर्यंत LPDDR4X RAM मिळते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये 0.7 मायक्रोमीटर पिक्सेल साइड आणि f/1.7 अपर्चर लेन्ससह 64-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून स्मार्टफोनमध्ये 119-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि f/2.2 अपर्चर लेन्ससह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देखील आहे. दोन्ही कॅमेरे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन (EIS) सपोर्टसह येतात. OnePlus Nord CE 2 5G मध्ये f/2.4 अपर्चर लेन्ससह 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो सोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोन f/2.4 अपर्चर लेन्स आणि EIS सपोर्टसह 16-मेगापिक्सेल Sony IMX471 सेल्फी कॅमेरा दिला आहे - हाच सेन्सर OnePlus 9RT मध्ये देखील वापरला गेला आहे जो जानेवारीमध्ये लॉन्च झाला होता.

oneplus affordable smartphone oneplus nord ce 2 5g launched in india check price and details
रिलायन्स जिओला मोठा झटका! गमावले 1.29 कोटी ग्राहक; तर एअरटेलने..

- OnePlus Nord CE 2 5G 128GB च्या UFS 2.2 स्टोरेजसह येतो, जो डेडिकेटेड microSD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येतो. फोनमधील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, NFC, GPS आणि A-GPS यांचा समावेश आहे. याशिवाय फोनमध्ये एक्सलेरोमीटर, जायरोस्कोप, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. OnePlus Nord CE 2 5G मध्ये 4,500mAh बॅटरी मिळते जी USB Type-C वर 65W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनची मापे 160.6x73.2x7.8mm आणि वजन 173 ग्रॅम आहे.

oneplus affordable smartphone oneplus nord ce 2 5g launched in india check price and details
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर, आता 'या' शहरात देखील होणार विक्री

OnePlus Nord CE 2 5G ची किंमत किती?

OnePlus Nord CE 2 5G ची भारतातील किंमत 6GB+128GB व्हेरियंटसाठी 23,999 रुपये आहे तर 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. हा फोन बहामा ब्लू आणि ग्रे मिरर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार फोनची पहिली सेल 22 फेब्रुवारीपासून सुरू होईल. हा फोन कंपनीच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.

oneplus affordable smartphone oneplus nord ce 2 5g launched in india check price and details
कमी किमतीत दमदार फीचर्स, येतोय Moto G22 स्मार्टफोन; पाहा किंमत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com