
सरतेशेवटी OnePlus Band भारतात दाखल झाला आहे.
नवी दिल्ली : सरतेशेवटी OnePlus Band भारतात दाखल झाला आहे. कंपनीने याबाबतची माहिती सोमवारी जाहीर केली आहे. वनप्लसचा हा फिटनेस ट्रॅकर रेक्टँगूलर डिस्प्ले, मल्टीपल स्ट्रॅप कलर आणि वॉच फेस सपोर्टसोबत येतो. वनप्लस बँडमध्ये 13 एक्सरसाइज मोड आणि रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंगसारखे फिचर्स मिळत आहेत.
वनप्लस बँड भारतात 2,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा बँड 13 जानेवारीपासून ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वनप्लस स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध राहिल. बॉक्समध्ये वनप्लस बँड, ब्लॅक कलर स्ट्रॅप, वायर्ड चार्जिंग डोंगल, यूझर गाईड, रेड केबल क्लब वेलकम कार्ड आणि सेफ्टी तसेच वॉरंटी कार्ड मिळत आहे. याशिवाय युझर्स 399 रुपयांच्या किंमतीवर वेगवगेळे ऑरेंज आणि ब्लू बँड्सदेखील घेऊ शकतात.
हेही वाचा - Signal ऍप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे.
वनप्लस बँडमध्ये 1.1 इंच टच एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचे रिझॉल्यूशन 126X294 पिक्सल आहे. याचा ब्राइटनेसला मॅन्यूअली ऍडजस्ट केलं जाऊ शकतं. याच्या फिटनेस ट्रॅकर मध्ये एक ब्लड ऑक्सिजन सेंसर, 3- ऍक्सिस एक्सीलेरोमीटर आणि जायरोस्कॉप, ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर दिले गेले आहेत.
हा बँड रनिंग, इंडोर रनिंग, फॅट बर्न रनिंग, आऊटडोअर वॉक, आऊटडोअर सायकलिंग, इंडोर सायकलिंग, एलिक्पिकल ट्रेनर, रोइंग मशिन, क्रिकेट, बँडमिंटन, पूल स्विमिंग, योग अशा एक्सरसाइझ मोडला सपोर्ट करतो. हा धूळ, पाणी आणि घामामुळे खराब होत नाही. खास गोष्ट अशी आहे की वनप्लस बँड हिंदी भाषेला देखील सपोर्ट करतो.