जबरदस्त फीचर्ससह OnePlusची नवी सीरिज लाँच; कॅमेरा, किंमत आणि बरंच काही

OnePlus
OnePlus

OnePlus 9 mobile : पुणे : चीनमधील अग्रगण्य स्मार्टफोन कंपनी असलेल्या वनप्लसने वनप्लसची नवी सिरीज लाँच केली आहे. या नव्या सीरीजमध्ये वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9 आरचा समावेश आहे. वनप्लस कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून मंगळवारी (ता.२३) संध्याकाळी ही सीरिज लाँच केली. वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा आनंद यूजरला लुटता यावा, यासाठी वनप्लसने हसलब्लेड (Hasselblad) सोबत करार केला आहे. 

वनप्लस 9 सीरिजमध्ये आहेत जबरदस्त फीचर्स 
वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो क्वाडकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा वापर केला आहे. स्मार्टफोनमध्ये 4500 mAh ची बॅटरीसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. वनप्लस 9 मध्ये 6.55 इंचाचा फूल एचडी प्लस फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. त्याचबरोबर यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सरदेखील देण्यात आला आहे. तर 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसर दिला आहे.  यानंतर, 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेराही या मोबाईलमध्ये देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वनप्लस-9 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 49,999 रुपये, तर 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 54,999 रुपये पासून सुरू होईल.

वनप्लस 9 प्रो
वनप्लस 9 प्रोमध्ये स्नॅपड्रॅगन 5 जीबी प्रोसेसरचा वापर केला असून 12 जीबी रॅमसह 256 जीबीपर्यंत स्टोरेज दिलं आहे. 48MP प्रायमरी कॅमेरा सेंसरसह, 50MP सेकेंडरी कॅमेरा अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेंससोबत दिला आहे. तर 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनचं वैशिष्ट्यं म्हणजे यात यूजर्सना Hasselblad Pro Mode मिळणार आहे. फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. वनप्लस 9 प्रोची 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 64,999 रुपये, तर 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 69,999 रुपये असेल.

वनप्लस 9 आर
एंट्री-लेव्हल वनप्लस 9 आरमध्ये 6.5 इंचाचा रिफ्रेश डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 690 प्रोसेसरसह गेमिंग ट्रिगरचा देखील समावेश करण्यात आला आहे. वनप्लस 9 आर कॅमेरामध्ये एफ/1.7 लेन्स आणि 8 एमपी अल्ट्राव्हायलेट लेन्ससह 64 एमपी प्राइमरी कॅमेरा सेन्सर आहे. विशेष म्हणजे हा फोन वनप्लस 9 सीरिजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज व्हॅरिएंटची किंमत 39,999 रुपये, तर 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये असणार आहे. त्यामुळे चांगले फिचर्स असलेल्या वनप्लसच्या या स्मार्टफोन्सचा नक्की विचार करावा. 

- सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com