esakal | OnePlus मोबाईलचा स्फोट; जखमी वकील कंपनीला कोर्टात खेचणार
sakal

बोलून बातमी शोधा

One Plus Nord 2 Blast

OnePlus मोबाईलचा स्फोट; जखमी वकील कंपनीला कोर्टात खेचणार

sakal_logo
By
सुधीर काकडे

वन प्लस कंपनी ही आपल्या फोनच्या फिचर्स आणि इतर गोष्टींमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा वन प्लस फोन चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा फोनच्या फिचर्स किंवा कुठल्याही अपडेट बद्दल नाही, तर चर्चा होतेय फोनचा स्फोट झाल्याच्या बातमीमुळे. गौरव गुलाटी नामक एका दिल्लीतील वकीलाने वन प्लस नॉर्ड २ ला आग लागुन त्याचा स्फोट झाल्याचे सांगितले. गौरव गुलाटीने केलेल्या दाव्याने मात्र वन प्लस मोबाईल वापरणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

कंपनीचा लेटेस्ट प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन वनप्लस नॉर्ड 2 ला आग लागुन स्फोट झाल्याचा दावा गौरव गुलाटी नामक एका व्यक्तीने केला. गुलाटी यांचा असा आहे की, त्याच्या ONE PLUS NORD 2 ला आग लागली आणि स्फोट झाला. या ट्विटसह गुलाटी यांनी आपल्या फोनचे फोटो देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये एक फुटलेला फोन दिसतो आहे. गौतम गुलाटी यांनी यावेळी असेही सांगितले की, ही घटना घडली तेव्हा फोन चार्जिंगला किंवा वापरात नव्हता. वकील परिधान करतात त्या काळ्या सुटमध्ये हा फोन ठेवलेला होता. त्यामुळे कंपनी विरोधात आपण ग्राहक मंचाकडे तक्रार करणार असल्याचे देखील गुलाटी यांनी सांगितले.

वनप्लस कंपनीने काय सांगितले?

गौतम गुलाटी यांनी सोशल मीडियावर आणि ट्विटरद्वारे फोटो शेअर केल्यानंतर वनप्लसचे अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. कंपनीने यावेळी गुलाटी यांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच भरपाई देखील दिली जाईल असे सांगितले. मात्र गुलाटी यांनी ही भरपाई स्विकारण्यास नकार दिला. या घटनेत जर कुणाचा जीव गेला असता तर त्याची भरपाई कशी दिली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला असल्याचे मायस्मार्टप्राईसने दिलेल्या वृत्तामधून समोर आले आहे.

हेही वाचा: काय असेल iPhone 13 Pro Max ची किंमत आणि फीचर्स? पाहा डिटेल्स

‘आम्ही कंपनीच्या विरूद्ध न्यायालयात नुकसान भरपाई दाखल करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. जर ते भरपाई करण्यास तयार असतील, ते त्यांनी सार्वजनिकरित्या लेखी करार करू शकतात किंवा आम्ही कायद्यानुसार पाठपुरावा करू आणि त्यांना वनप्लस नॉर्ड 2 5G हे उपकरण त्वरित बंद करण्यास सांगू’, अशी माहिती गुलाटीने मायस्मार्टप्राईसला दिली आहे.

loading image
go to top