esakal | काय असेल iPhone 13 Pro Max ची किंमत आणि फीचर्स? पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 13

काय असेल iPhone 13 Pro Max ची किंमत आणि फीचर्स? पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

Apple ची iPhone 13 सीरीज लाँच होण्यास एक आठवड्यापेक्षा कमी काळ शिल्लक राहिला आहे. दरम्यान या सिरीज लॉंचची वाट जगभरातील चाहते पाहत आहेत. दरम्यान ही सिरीज 14 सप्टेंबरला लाँच होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या नवीन आयफोन 13 सीरीज अंतर्गत Apple कंपनीचे iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि Phone 13 Mini हे स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. मात्र हे फोन अधिकृतपणे लॉंच करण्यापूर्वीच, या सिरीजमधील आयफोन 13 प्रो मॅक्सच्या टॉप व्हेरियंट बद्दलची माहिती लीक झाली आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स समोर आले आहेत.

नेमकी किंमत किती असेल?

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसारआयफोन 13 प्रो मॅक्स कंपनी 1,099 डॉलर्स म्हणजेच 80,679 रुपये किंमतीसह लॉंच करेल. या फोनची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन पांढरा, काळा आणि प्रॉडक्ट(लाल) कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. हा फोन गुलाबी रंगात देखील उपलब्ध असेल असे देखील बोलले जात आहे.

हेही वाचा: कमी किंमतीत भरपूर स्पेस, कमर्शियल वापरासाठी या कार आहेत बेस्ट

हे असतील खास फीचर्स

iPhone 13 Pro Max मध्ये 6.7-इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो, तसेच ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत असू शकतो. या फोनच्या डिस्प्लेमध्ये आधी छोट्या नॉच दिल्या जातील, तसेच या फोनमध्ये Face ID 2.0 देखील देण्यात येऊ शकते. यामध्ये तुम्हाला तीन व्हेरियंट मिळतील, ज्यात 128GB, 512GB आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात येईल. कंपनी या सिरीजमध्ये आपला खास लेटेस्ट प्रोसेसर A15 Bionic देखील सादर करत आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

आयफोन 13 प्रो मॅक्स स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. व्हिडीओसाठी, त्यात ProRes फीचर देखील दिले जाऊ शकते. तसेच फोनमध्ये f / 1.8 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिले जाऊ शकतात. कंपनी या मॉडेलमध्ये अॅस्ट्रोफोटोग्राफी मोड देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बॅटरीबद्दल सांगायचे झाल्यास आयफोन 13 च्या टॉप मॉडेलमध्ये 4352mAh ची बॅटरी आढळू शकते, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

हेही वाचा: Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत आणि फीचर्स

loading image
go to top