आता चार्जिंगचं नो टेन्शन! येतोय OnePlus चा 15 मिनिटांत चार्ज होणारा फोन

oneplus nord 3 soon launch with 150w fast charging technology may get charge in 15 minute
oneplus nord 3 soon launch with 150w fast charging technology may get charge in 15 minute

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2022 मध्ये आपले लेटेस्ट 150W चार्जिंग तंत्रज्ञान लाँच केले. कंपनीने म्हटले आहे की, 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान लॉन्च होणार्‍या स्मार्टफोनपैकी एक नवीन चार्जिंग टेक्नोलॉजी असलेला फोन सादर केला जाईल. AndroidCentral च्या रिपोर्टनुसार कंपनी आपल्या लेटेस्ट 150W चार्जिंग तंत्रज्ञानासह OnePlus Nord 3 लाँच करेल. या टिपस्टर मुकुल शर्माच्या मते, OnePlus Nord 3 भारतीय बाजारपेठेत मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला येऊ शकतो. शिवाय, वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी यापूर्वी सांगितले होते की कंपनी 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत वनप्लस हँडसेट लॉन्च करेल.

150W चार्जिंगने असेल सुसज्ज

MWC 2022 मध्ये कंपनीने उघड केलेल्या लेटेस्ट चार्जिंग टेक्नोलॉजी बद्दल बोलताना, Oppo ने माहिती दिली आहे की, सनवीन 150W SuperVOOC चार्जिंग 4,500mAh बॅटरीसह हा फोन फक्त 15 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करता येईल. शिवाय, चार्जिंग टेक्नोलॉजी 4,500mAh बॅटरी असलेला फोन फक्त पाच मिनिटांत 1% ते 50% पर्यंत चार्ज करण्यास सक्षम आहे.

oneplus nord 3 soon launch with 150w fast charging technology may get charge in 15 minute
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

OnePlus Nord 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

मागील रिपोर्टमध्ये OnePlus डिव्हाइस बद्दल माहिती दिली होती तो फोन OnePlus Nord 3 असल्याचे म्हटले जाते. लीक नुसार, स्मार्टफोनच्या Nord सिरीजमधील पुढील स्मार्टफोन 6.7-इंचाच्या फुल-HD+ OLED डिस्प्लेसह येऊ शकतो. 120Hz रिफ्रेश रेट आणि सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. चार कॉर्टेक्स-ए 78 कोरसह हा डिव्हाईस MediaTek Dimensity 8100 चिपसेट सपोर्टसह असण्याची अपेक्षा आहे. याच्या स्टोरेजबद्दल अद्याप अचूक माहित नाहीत, परंतु स्मार्टफोन LDDR5 RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. डिव्हाइसमध्ये 4,500mAh बॅटरी असल्याचे म्हटले जाते आणि मागील बाजूस 50MP प्रायमरी लेन्स असेल. OnePlus Nord 3 Android 12 वर काम करू शकतो.

oneplus nord 3 soon launch with 150w fast charging technology may get charge in 15 minute
व्हॉट्सॲपचे 'हे' भन्नाट फीचर गुगल देतंय Gmail मध्ये, वाचा डिटेल्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com