ऑनलाईन आमंत्रण ट्‌विटर भाषा संमेलनासाठी! 

स्वप्नील शिंगोटे 
गुरुवार, 5 जानेवारी 2017

ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे  ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. पण मग अशा या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे? 

ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे  ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. पण मग अशा या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे? 

सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्‌स लिहिल्या जाव्यात या ध्येयातूनच ञ्चट्विटरसंमेलन या कल्पनेचा जन्म झाला. गेल्या वर्षी पहिले भाषा संमेलन झाले. यंदाचे 
#ट्विटरसंमेलन 3,4,5,6 फेब्रुवारीला होते आहे. चार दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून आपण यात सहभागी होऊ शकता.

संमेलनाबद्दल माहितीसाठी @MarathiWord  ट्विटरखात्याशी संलग्न व्हावे. संमेलनाचा मुख्य हॅशटॅग असेल ञ्चट्विटरसंमेलन आणि सोबत असतील "बारा हॅशटॅग मित्र". व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे विषय निवडून त्याचे हॅशटॅग केले आहेत. थोडक्‍यात ट्विट करताना दोन हॅश टॅग वापरायचे आहेत, एक मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आणि सोबत बारा हॅश टॅग पैकी एक हॅशटॅग. काय आहेत हे बारा हॅश टॅग ?

#माझीकविता : तुम्ही कविता करता? ती कविता हजारो लोकांनी वाचावी असे तुम्हाला वाटते ? उत्तर हो असेल तर वापरा #माझीकविता. तुम्हाला आवडलेल्या इतर कविता ञ्चमाझीकविता वापरून तुम्ही ट्विट करू शकता. कविता मोठी असेल तर ती कागदावर लिहून किंवा मोबाईलवर टंकित करून त्याचे छायाचित्र काढून ट्विटावे. मागील संमेलनातील निवडक कवितांचे इ-बुक तयार करण्यात आले होते, यंदाही तो प्रयत्न राहील. 

#माझीकथा : चला ट्विटरवर मराठी कथा लिहूया शंभर ट्विट्‌समध्ये.फक्त शंभर ट्विट्‌स मध्ये तुम्हाला लिहायची आहे एक कथा वापरून #माझीकथा. तुम्ही एखादी दिर्घकथा सुद्धा आपल्या ब्लॉगवर लिहून ञ्चमाझीकथा वापरून दुवा ट्विट करू शकता.  

#माझा ब्लॉग : तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग बद्दल चर्चा #माझाब्लॉग वापरून करू शकता. ब्लॉगचा दुवा देऊन ट्विटमध्ये ब्लॉग बद्दल थोडक्‍यात माहिती लिहावी. 

#माझीबोली : महाराष्ट्रात आपण जरी मराठी बोलत असलो, तरी राज्यातील प्रत्येक भागात मराठीच्या वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत. प्रत्येक बोलीत प्रचंड समृद्ध असे ज्ञान भांडार आहे. या बोली डीजीटल युगात टिकल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते. त्या बोलीने वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेले ज्ञान जगासमोर येणे गरजेचे आहे. म्हणुन #माझीबोली वापरून आपण आपल्याला माहीत असलेल्या  बोलींबद्दल ट्विट करू शकता. बोलीतील शब्द,गाणी,म्हणी,अभंग,ओवी,काव्य आणि तिचे स्वतःचे असे व्याकरण इतर मराठी माणसांना समजावून सांगू शकता. 

#साहित्यसंमेलन : डोंबिवली साहित्य संमेलनात व्यक्त झालेल्या विचारांवर , इतर घडामोडींवर आणि अध्यक्षीय भाषणावर आपण आपले मत #साहित्यसंमेलन वापरून नोंदवू शकता. 

#वाचनिय : तुम्हाला कुठले पुस्तक आवडले? सध्या तुम्ही काय वाचत आहात? कुठले लेखक/लेखिका तुम्हाला विशेष आवडतात? तुमच्या वाचन प्रेमाबद्दल आम्हाला जाणून घ्या यला आवडेल. समृद्ध अशा मराठी साहित्या बद्दल #वाचनीय वापरून तुम्ही चर्चा करू शकता. 

#हायटेकमराठी : मराठीच्या कक्षा आता रुंदावत आहेत. आता मराठी संगणकावर दिसते, मोबाईलवर दिसते , परंतु मराठीसाठी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी मराठी तयार करण्यासाठी अजूनही कल्पक प्रयत्नांची गरज आहे. मराठीला हायटेक आणि डिजिटल माध्यमांवर सुपरहिट बनवण्यासाठी तुमच्या डोक्‍यातील कल्पना तुम्ही #हायटेक मराठी वापरून ट्विट करू शकता. मराठी संकेतस्थळ,ऍप्स, फॉन्ट्‌सबद्दल माहिती तुम्ही #हायटेकमराठी वापरून देऊ शकता. 

#बोलतोमराठी : आपण जाल तिथे मराठी बोलता का? तुमचे अर्थ आणि सामाजिक व्यवहार मराठीत करता का? तुम्हाला कुठल्या अडचणी येतात ? महाराष्ट्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी काय करायला हवं ? तुम्ही प्रतिकूल वातावरणातही मराठी आवर्जून वापरली त्याचे किस्से आणि वरील 
प्रश्नांवर चर्चा तुम्ही #बोलतोमराठी वापरून करू शकता. 

#मराठीशाळा : मराठी शाळांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची #मराठीशाळा वापरून आपण चर्चा करू शकता. आपल्या भागांतील यशस्वी पणे चालणाऱ्या मराठी शाळांची ओळख आम्हाला करून देऊ शकता. मराठी शाळेत शिकून आज विविध ज्ञानशाखांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींची ओळख करून देऊ शकता. मराठी शाळेत शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आणि आठवणी आपण #मराठीशाळा वापरून ट्विट करू शकता. 

#भटकंती : तुम्ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गडकिल्ले, मंदिरे, जंगले, डोंगरदऱ्यांबद्दल चर्चा #भटकंती वापरून करू शकता. आपल्या भागातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देऊ शकता. #भटकंती प्रवासाची आवड असणाऱ्या पावलांच्या अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ आहे. 

#खमंग : खवैयांसाठी हे खास हॅशटॅग. महाराष्ट्र आणि जगात इतर कुठेही बनवल्या जाणाऱ्या स्वादिष्ट पाककृतींची चर्चा आपण #खमंग वापरून करू शकता. आपण पदार्थ आणि तो बनवण्याची कृती कागदावर किंवा मोबाईलमध्ये मराठीत लिहून, त्याचे छायाचित्र काढून ट्विट करायचे आहे. 

#माझाछंद : तुमच्या छंदाविषयी तुम्ही ञ्चमाझाछंद वापरून चर्चा करू शकता. तुम्ही काढलेले छायाचित्र,रांगोळी,चित्र आम्हाला ट्विट करू शकता. तुम्ही एखादे गायलेले गाणे ट्विट करू शकता. मन रमवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या छंदाविषयी व्यक्त होण्यासाठी #माझाछंद हे व्यासपीठ आहे. याबरोबरच ट्विटर संमेलनात ट्विट व्याख्याने, चर्चासत्रे, ठराव, नवशब्द निर्मिती असे अनेक  उपक्रम आहेत. त्यामुळे ऑनलाईन या आणि सहभागी व्हा या संमेलनात... 

Web Title: Online meeting invitation language Twitter!