
Online Railway Ticket Booking करताय? हॅकर्सचा या प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ, एवढ्या कोटींना विकला डेटा
Online Fraud : 'रेलयात्री' हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे आणि ते IRCTC द्वारे अधिकृत आहे. मात्र या वेबसाइटचा डेटा हॅक करण्यात आला असून यूजर्सची पर्सनल माहिती, मोबाईल नंबर, यूजर्सची नावे, ईमेल आयडी यांचा समावेश या डेटामध्ये आहे.
हा डेटा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. RailYatri वापरकर्त्यांना तिकीट बुक करण्याची, त्यांचे PNR स्टेटस तपासण्याची आणि भारतातील ट्रेन प्रवासाशी संबंधित इतर माहिती पाहण्याची परवानगी देते. सायबर पोलिस आता यावर लक्ष ठेवून असून तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क केले जाईल.
एका सायबर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'फोन नंबरमुळे या गैरप्रकाराची व्याप्ती खूप वाढते. हॅकर्स यूजर्सच्या मोबाइल नंबरचा वापर लोकांचे लैंगिक शोषण, नोकरीचे आमिष किंवा पोलिस अधिकारी आहे असे सांगून आर्थिक फसवणूक यासारख्या गुन्ह्यांसाठी लक्ष्य ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय, बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी यूजर्सचे नाव, ईमेल आणि फोन नंबर वापरला जाऊ शकतो. कागदपत्रांसह अनेक गोष्टी करता येतात. जसे की बँक खाते उघडणे किंवा सिम कार्ड खरेदी करणे.
यूजर्सचा डेटा 3.1 कोटीमध्ये विकला गेला
सूत्रांनुसार, RailYatri मधील 3.1 कोटी यूजर्सच्या डेटा एका फोरमवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. युनिट82 असे हॅकरचे नाव आहे. हॅकरने पोस्ट शेअर केली आणि दावा केला की ती डिसेंबर 2022 मध्ये हॅक झाली होती. हॅकरने एक लिंक देखील शेअर केली होती जिथून कोणी हा डेटा खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकतो.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही गुपित माहिती सांगितली की, डेटा लीक झाल्याचा कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. युनिट 82 पत्रकारांना $300 म्हणजेच सुमारे 25,000 रुपयांना डेटा विकला जात आहे.