Flipkart वरून खरेदी करणं महागलं! आता 'कॅश ऑन डिलिव्हरी'साठी द्यावे लागणार अतिरिक्त पैसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online Shopping flipkart will now charge extra for cash on delivery orders know details

Flipkart वरून खरेदी करणं महागलं! आता 'कॅश ऑन डिलिव्हरी'साठी द्यावे लागणार अतिरिक्त पैसे

आपल्यापैकी अनेकांसाठी फ्लिपकार्ट हे अनेक ऑनलाइन खरेदीदारांचे आवडते प्लॅटफॉर्म आहे आणि जर तुम्ही देखील फ्लिपकार्टवरून खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फ्लिपकार्टवरून खरेदी करणे लवकरच महाग होणार असून कॅश ऑन डिलिव्हरीसाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

फ्लिपकार्ट मोबाइल अॅप आणि वेबसाइटकडून माहिती देण्यात आली आहे की वापरकर्त्यांनी ई-शॉपिंग प्लॅटफॉर्मवर 'कॅश ऑन डिलिव्हरी' पर्याय निवडल्यास त्यांना आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. म्हणजेच जर युजर्सने ऑनलाइन पेमेंट केले नाही तर त्यांना थोडे जास्तीचे शुल्क द्यावे लागेल .मात्र, ही पाच रुपयांची अधीकची रक्कम डिलीव्हरी झाल्यानंतर घेतली जाईल.

फ्लिपकार्ट वापरकर्त्यांना सध्या एका विशिष्ट किंमतीपेक्षा कमी उत्पादनांवर डिलिव्हरी फी भरावी लागते, हे शुल्क ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय या दोन्हीवर भरावे लागते. ऑर्डरचे मूल्य 500 रुपयांपेक्षा कमी असल्यास आणि ते Flipkart Plus वर लीस्टेड असल्यास, 40 रुपये डिलीव्हरी शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा: Kangana Ranaut: 'कंगनाचे पक्षात स्वागत, पण...'; लोकसभा निवडणुकीत तिकीट देण्याबाबत नड्डा स्पष्टच बोलले

दरम्यान 500 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरसाठी कोणतेही डिलीव्हरी शुल्क नाही. तसेच, जे Flipkart Plus चे सदस्यत्व घेतात त्यांना कोणत्याही डिलिव्हरी शुल्काशिवाय अनेक उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळते. त्याच वेळी, आता कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडणाऱ्या सर्व खरेदीदारांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील आणि हे सर्वांसाठी अनिवार्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: Stamped South Korea: हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी; 50 जणांना हृदयविकाराचा झटका

ऑनलाइन पेमेंट करणार्‍यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न

या बदलासह, अधिकाधिक खरेदीदार ऑनलाइन पेमेंट करतील आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय कमीत कमी निवडला जावा यासाठी प्लॅटफॉर्म प्रयत्न करत आहे. कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शनसोबत देण्यात आलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये असे लिहिले आहे की, या पर्यायासह (कॅश ऑन डिलिव्हरी) दिलेल्या ऑर्डरवर हॅंडलींग कॉस्टमुळे 5 रुपये शुल्क आकारले जाईल. तुम्ही आता ऑनलाइन पेमेंट करून हे शुल्क टाळू शकता.

टॅग्स :flipkart