
Oppo F31 Pro smartphone launch details
esakal
Oppo F31 Pro स्मार्टफोन उद्या लॉंच होणार आहे
त्याआधीच याची किंमत आणि फीचर्सची माहिती लिक झाली आहे
चला तर जाणून घ्या सगळं काही सविस्तर
Oppo F31 Pro Details : ओप्पो त्यांची नवीन F31 स्मार्टफोन सिरीज उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला भारतात लाँच करणार आहे. पण लाँचपूर्वीच या सिरीजच्या किमतींचा खुलासा झाला आहे. F31, F31 Pro आणि F31 Pro+ अशा तीन मॉडेल्सच्या या मालिकेत मिडरेंज स्मार्टफोन्सच्या मार्केटमध्ये क्रांती घडवण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षीच्या F29 मालिकेच्या तुलनेत यंदा बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा यांमध्ये उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तंत्रज्ञानप्रेमींमध्ये उत्साह आला आहे.