
Oppo Reno 14 5G Diwali Edition Launched
esakal
Oppo Reno 14 Diwali Edition : दिवाळीचा सण जवळ येत असताना ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo Reno 14 5G दिवाळी एडिशन सादर केला आहे, जो त्याच्या आकर्षक डिझाइन आणि अनोख्या फीचर्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा खास श्रेणीतील फोन दिवाळीच्या गोल्ड रंगात उपलब्ध झाला आहे, ज्यावर मागील बाजूस सुंदर रांगोळीची डिझाइन कोरलेली आहे. हे डिझाइन सणाच्या उत्साहाला साजेसे आहे आणि तरुणाईला नक्कीच आवडेल.