स्वत:चे वय कमी समजणारे ठरताता दिर्घायुषी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

तुमचे वय किती आहे असे तुम्हाला वाटते? जरा विचार करून उत्तर द्या. कारण त्यावरून तुम्ही किती जास्त वर्षे जगणार हे ठरू शकते. ज्या व्यक्तींना आपले वय सध्याच्या वयापेक्षा कमी आहे असे वाटणारे लोक जास्त काळ जगतात, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांनी हा अभ्यास केला. याआधीच्या संशोधनातील माहितीचा उपयोग करत संशोधक अँड्य्रू स्टिप्टो आणि इस्ला रिप्पन यांनी सहा हजारांहून अधिक वृद्ध व्यक्तींना यात सहभागी करून घेतले. आपले वय आहे

तेवढे किंवा एक वर्षाने जास्त मानणाऱ्या वृद्धांच्या तुलनेत वय तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांनी कमी समजणाऱ्या वृद्धांमध्ये मृत्यू दराचे प्रमाण कमी असल्याचे संशोधकांना आढळून आले. आजारपण, संपत्ती, शिक्षण, धूम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचाल असे मृत्यू दराला कारणीभूत असणारे घटक लक्षात घेऊनसुद्धा"खूप वय झाले'असे मानणे हे मृत्यूचे सूचक आहे. आपल्या वयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे ही आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी मांडला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Own less than five years of age are less persuasive Long