
esakal
नासाच्या पार्कर सोलर प्रोबने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. १८ सप्टेंबरला मेरिलँडमधील जॉन्स हॉपकिन्स ॲप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी (एपीएल) येथील नियंत्रण केंद्राशी संपर्क साधत या अंतराळयानाने सूर्याच्या वातावरणातून स्वायत्तपणे यशस्वी प्रवास केला. या मिशनदरम्यान १० ते २० सप्टेंबर या कालावधीत पार्करने ताशी ६,८७,००० किलोमीटरचा विश्वविक्रमी वेग गाठला.