Holi Special sale! घरगुती सामानापासून स्मार्टफोनपर्यंत; Paytm वर मिळणार भरघोस डिस्काऊंट

 maha shopping festival
maha shopping festival
Updated on

नवीन वर्ष किंवा एखादा सण, उत्सव जवळ आला की अनेक इ कॉमर्स कंपन्या ग्राहकांसाठी विविध ऑफर्स सुरु करतात. यात खासकरुन अॅमेझॉन, फ्लिकार्ट या कंपन्या अग्रेसर असल्याचं दिसून येतं. मात्र, यावेळी पेटीएमने खास ग्राहकांसाठी होळी स्पेशल ऑफर बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे या ऑफर्सच्या माध्यमातून घरातील सामानापासून ते स्मार्टफोनपर्यंत अनेक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. इतकंच नाही तर, या ऑफरमध्ये iPhone, Samsung आणि Oppo या सारख्या दिग्गज ब्रॅण्डवरही सूट असल्याचं पाहायला मिळत आहे.

१. घरगुती सामानांवर असेल ही सूट
Paytm Holi Sale 2021 मध्ये प्रत्येक वस्तूवर जवळपास ४५ ते ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.  यात एअर कंडिशनरवर ४५ टक्क्यांची सूट आहे. तर, स्मार्ट टिव्हीवर ६० टक्क्यांपर्यंत सूट आहे. इतकंच नाही तर, वॉशिंग मशीन, फ्रीज अशा वस्तूंवरही ऑफर्स उपलब्ध आहेत.

२. स्मार्टफोनवर डिस्काऊंड -

iPhone, Samsung आणि Oppo यासारख्या मोठमोठ्या ब्रॅण्डवर ६० टक्क्यांची सूट आहे. विशेष म्हणजे Samsungच्या स्मार्टफोनवर जवळपास ४ हजार ९९९ रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळत आहे. तर, टॅबलेट्सवर ४० टक्के डिस्काऊंट आहे. या ऑफरमध्ये तुम्ही लॅपटॉपदेखील खरेदी करु शकता. HP Laptops वर २० टक्के डिस्काऊंड आहे. तर, Lenovo Laptops वर ३५ टक्के सूट आहे.

३. कपड्यांवरही मिळणार सूट -
सध्या बाजारात होळी स्पेशल डिझायनर शर्ट मिळत असून या टी शर्टवरदेखील सूट देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टी शर्टवर तब्बल ८० टक्के सूट मिळत आहे. तसंच उन्हाळ्यातील स्पेशन ट्रेंडी टी शर्टवर ६० ते ७० टक्के सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये केवळ टी शर्टचं नव्हे तर शर्ट, ट्राऊजर यांच्यावर ६० टक्के आणि साड्यांवर ७० टक्के डिस्काऊंट मिळत आहे.

४.  अन्य वस्तूंवरही भन्नाट सेल -
हेडसेटवर ६० टक्के, ट्रिमरवर ५० टक्के, पेन ड्राइव्ह ३० आणि पॉवर बँकवर ६३ टक्के सूट मिळत आहे. तसंच हेडफोन्स, हेडसेट,स्पीकर, मोबाईल अॅक्सिसिरीजवर ३ हजारांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com