Paytm प्ले स्टोअरवरून हटवलं, गुगलच्या कारवाईनंतर कंपनीने दिली प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पेटीएम हे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणार अॅप असून महिन्याला तब्बल 5 कोटी युजर्स सक्रीय आहेत. 

नवी दिल्ली - गुगलने इंडियन फायनान्शियल सर्व्हिस अॅप पेटीएम प्ले स्टोअरवरून हटवलं आहे. कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचे समजते. पेटीएम हे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणार अॅप असून महिन्याला तब्बल 5 कोटी युजर्स सक्रीय आहेत. या अॅपच्या सहाय्याने युजर्स एकमेकांना पैसे पाठवू शकतात. पण आता हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यात आलं आहे. 

प्ले स्टोअरवरून हटवण्यात आल्यानंतर गुगलने म्हटलं की, प्ले स्टोअर ऑनलाइन कॅसिनो आणि इतर अॅप ज्यातून भारतात खेळामध्ये जुगार लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅपना प्रतिबंधित करते. आय़पीएल सुरु होण्याच्या एक दिवस आधीच गुगलने हा मोठा निर्णय घेतला आहे. पेटीएमकडून सातत्याने कंपनीच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे वृत्त टेक क्रंचने दिले आहे.

इतर बाजारांमध्ये कंपनीच्या पॉलिसींचे उल्लंघन होत नाही. गाइडलाइन्सचे पालन केले जाते. मात्र जर एखादे अॅप ग्राहकांना इतर संकेतस्थळांवरून पैसे किंवा रोख रकमेची बक्षिसे जिंकण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी सपोर्ट करत असेल तर ते प्ले स्टोअरचं उल्लंघन असल्याचं गुगलने म्हटलं आहे. 

Paytm अॅप One97 Communication Ltd. ने डेव्हलप केलं आहे. आता हे अॅप Google Play Store वर सर्च केल्यास दिसत नाही. सध्या स्मार्टफोनवर असलेलं अॅप काम करत आहे. Paytm पेमेंट अॅपशिवाय कंपनीची इतर अॅप्स Paytm for business, Paytm money, Paytm mall ही अजुनही Google Play Store वर उपलब्ध आहेत. 

पेटीएमचे अँड्रॉइड अॅप तात्पुरत्या काळासाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल. लवकरच ते पुन्हा सर्वांसाठी उलब्ध होईल. सर्व युजर्सचे पैसे सुरक्षित असून तुम्ही अॅप पुन्हा वापरू शकाल असं पेटीएमने म्हटलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paytm removed from google play store for policy violateion

Tags
टॉपिकस
Topic Tags: