Petrol Pumps : वेळीच सावध व्हा! पेट्रोल पंपावर या पाच प्रकारे फसवणूक करण्याचा ट्रेंड वाढतोय

इंधन भरण्यापूर्वी मीटर रीसेट करण्यास विसरू नका, नाहीतर...
Petrol Pumps
Petrol Pumps esakal

Petrol Pumps : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत आहे. वाढत्या किमतीने सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. याचदरम्यान अनेकदा पेट्रोल पंपावर फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. फ्यूल स्टेशन्सवर ग्राहकांना पूर्ण पेट्रोल दिलं जात नाही आणि त्यांच्यासोबत फसवणूक केली जाते.

आधीच महागाई त्यात अशी फसवणूक त्यामुळे लोकांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे पेट्रोल पंपावर इंधन भरताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. ग्राहक सतर्क राहिल्यास अशी फसवणूक टाळता येऊ शकते.

ग्राहकांनी पंपावर गेल्यावर तुमचीही अनेकदा फसवणूक झाली असेल. पण, तुम्हाला याची पुसटशी कल्पनाही नसेल. त्यामुळे पेट्रोल भरायला गेल्यावर काय काळजी घ्यावी याबद्दलच्या काही टीप्स आपण पाहुयात.ज्यामुळे तुमची फसवणूक होण्यापासून बचाव होऊ शकतो.

Petrol Pumps
Tech Tips :आयफोनची बॅटरी बदलताय, चेक करा हा ऑप्शन ; होईल 5500 चे नुकसान

मीटर रिसेट न करता पेट्रोल भरणे

आधीच्या ग्राहकाच्या कारमध्ये पेट्रोल भरलेल्या मिटरवरत तुमच्या गाडीत पेट्रोल भरले जाते. ही एक प्रकारची फसवणुकच आहे. या प्रकारची फसवणूक बर्‍याचदा सतर्क नसलेल्या ग्राहकांची होते. या फसवणुकीत ग्राहकाने ठराविक प्रमाणात पेट्रोल भरल्यावर पेट्रोल कर्मचारी मीटर रिसेट न करता तुमच्या वाहनात इंधन भरतो.

या फसवणुकीत तुमच्या कारमध्ये खूपच कमी पेट्रोल भरले जाते, परंतु तुम्हाला संपूर्ण रक्कम भरावी लागते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, इंधन भरण्यापूर्वी मीटर रीसेट करण्यास विसरू नका.

Petrol Pumps
Tech Tips : WhatsApp वर विकत घेता येणार मेट्रो तिकीट, कार्डदेखील होणार रिचार्ज

इंधनाचा दर्जा खराब असू शकतो

काही पेट्रोल पंपांवर कर्मचारी निकृष्ट दर्जाचे इंधन भरतात. या प्रकारच्या इंधनाचा केवळ तुमच्या खिशावरच परिणाम होत नाही, तर तुमच्या वाहनाच्या इंजिनलाही नुकसान होऊ शकते. तुम्हाला तेलाच्या गुणवत्तेबद्दल शंका असल्यास, तुम्ही पेट्रोल पंप अटेंडंटला इंजिन फिल्टर पेपर चाचणीसाठी विचारू शकता.

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर असणे अनिवार्य आहे. तसेच गरज असेल तेव्हा ते ग्राहकाला देणे आवश्यक आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने असे न केल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार करता येईल.

Petrol Pumps
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

चिप वाजवली जाते

काही पेट्रोल पंप कर्मचारी किंवा इंधन पंप मालक पेट्रोल भरण्याच्या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप घालतात. या चिपद्वारे तुम्ही तुमच्या वाहनात कमी पेट्रोल भरले तरीही तुम्हाला संपूर्ण रक्कम भरावी लागू शकते. 2020 मध्ये तेलंगणामध्ये अशीच एक घटना समोर आली होती. त्यामुळे तुम्हाला पेट्रोलच्या प्रमाणाबाबत काही शंका असल्यास पेट्रोल पंप अटेंडंटला मॅन्युअल मापून पेट्रोल भरण्यास सांगा. अशावेळी समोरून पेट्रोल भरताना दिसतं.

सिंथेटिक ऑईल

काही वेळा ग्राहकांच्या वाहनांमध्ये न विचारता रेग्युलर ऑईलऐवजी सिंथेटिक तेल भरले जाते. स्पष्ट करा की नियमित तेलाच्या तुलनेत, सिंथेटिक तेल सुमारे 5 ते 10 टक्के महाग आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात पेट्रोल भरावे लागू शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा त्या कर्मचाऱ्याला विचारा की ते गाडीत कोणते तेल टाकत आहेत.

Petrol Pumps
Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

पेट्रोलच्या किमती

काही पेट्रोल पंप कर्मचारी किंवा मालक पेट्रोल किंवा इंधनाच्या किमतीत फेरफार करून फसवणूक करू शकतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही वाहनात इंधन भरता तेव्हा मीटर तपासा. जेणेकरून अशा प्रकारची फसवणूक टाळता येईल.

Petrol Pumps
Tech Tips : लॅपटॉप, मोबाईल चार्ज करायला विजेची आवश्यकता नाही ! ही आयडिया वापरुन वाचवा लाईट बील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com