Relationship Facts : जोडीदाराची फसवणूक का बरं करावीशी वाटते?ही घ्या कारणं

तुम्ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक केलीय का? त्याचं कारण काय होतं
Relationship Facts
Relationship Facts esakal

 Relationship Facts : एक पार्टनर असूनही दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होणे हा सध्याचा ट्रेंड झालाय. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. पण, याचा परिणाम मात्र एकच आहे तो म्हणजे घटस्फोट. पती पत्नीमध्ये असणारे अनेक वर्षांचे नाते क्षणार्धात तुटते.

पती पत्नीमध्ये डिव्होर्सचं प्रमाण वाढलं आहे. यात जास्त केसेसमध्ये घटस्फोटाचं कारणं हे विवाह बाह्य संबंध हेच आहे. बऱ्याच लोकांमध्ये विवाह झाला असूनही पती किंवा पत्नी प्रामाणिक नाहीत. ते विवाह बाह्य संबंध प्रस्थापित करतात. त्यामुळेच घटस्फोट आणि ब्रेकअपचे प्रमाण वाढले आहे.

पण हे असं का होतंय? इतकी वर्ष जिच्यासोबत प्रामाणिक राहीलो. त्या व्यक्तीलाच धोका देण्याची वेळ का येतेय लोकांवर. याची काही कारणं आहेत. त्या कारणांतून आपण पार्टनरला धोका का दिला जातो, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

या प्रश्नाचे उत्तर जर्नल ऑफ सेक्स रिसर्चमध्ये सापडले आहे. यामध्ये संशोधकांनी अशा जवळपास 500 लोकांशी चर्चा केली ज्यांनी कधी ना कधी आपल्या पार्टनरची फसवणूक केली होती. यामुळे काही सामान्य कारणे समोर आली, जी एखाद्या नात्यात सर्वात जास्त फसवणूक करण्यास प्रवृत्त करतात.

पहिलं कारण : कंटाळवाणं नातं

लग्न किंवा रिलेशन जेव्हा सुरू होतं. तेव्हा अगदी नवं नातं, नवा जोडीदार यामुळे ते अधिक फुलतं, नवा जन्म घेतं. पण जेव्हा त्याच व्यक्तीसोबत आपण एक एक वर्ष पुढे जातो तेव्हा नातं बहरत जात नाही. तर, ते कंटाळवाणं होतं.

जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आपण ती गोष्ट करणं बंद करतो. तसंच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कंटाळा येतो. तेव्हा आपण त्याला धोका द्यायला लागतो. त्याची फसवणूक करून आपण फक्त आपला विचार करतो.

दुसरं कारण : वाहवत जाणे

जेव्हा कधी तुम्ही एखाद्या ऑफीस कामासाठी परदेशी गेला असता. तेव्हा सोबत असणारे कलिग, त्यांचे फ्रेंड्स यांच्याशी तुमची ओळख होते. आणि त्या फ्रेंडनी तुमच्यासोबत फ्लर्ट केला तर तुम्हीही त्याला प्रतिसाद देता. तेव्हा तुमच्यात ज्या गोष्टी घडतील त्याला रोखणारं कोणीच नसतं.

या कारणाने पार्टनरला सर्वात जास्त धोका दिला जातो. पण, इकडे तुमच्या आठवणीत असणाऱ्या पत्नी, गर्लफ्रेंड यांना तुम्ही विसरून जाता.

नातं टिकवायला एकमेकांच ऐकावं लागतं
नातं टिकवायला एकमेकांच ऐकावं लागतंesakal

तिसरे कारण : धोका  द्यायला मजा येते

मोठ्या संख्येने लोक फसवणूक करतात कारण ते त्याचा आनंद घेतात आणि पकडले जाण्याची भीती वाटत नाही. बरेचदा लोक हे केवळ रोमांचक करण्याच्या उद्देशाने करतात. यामध्ये मोठ्या संख्येने लोकही सामील आहेत, जे आपल्या जोडीदारावर आनंदी आहेत.

चौथे कारण : अटेंशन मिळवणे

नात्यात फसवणूक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जोडीदाराकडून लक्ष न देणे. यामुळे बरेचदा लोक स्वतःला चांगले वाटण्यासाठी नात्याबाहेर दुसरा पर्याय शोधू लागतात. जेणेकरून त्यांचा अहंकार वाढेल आणि त्यांना विशेष आणि महत्त्वाचे वाटू शकेल.

शारीरिक सुखासाठी कपल्स एकमेकांना फसवतात
शारीरिक सुखासाठी कपल्स एकमेकांना फसवतातesakal

पाचवे महत्त्वाचे कारण : शारीरिक सुख

शारीरिक सुख कोणाला प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. पण, सतत एका जोडीदारासोबत तेच सुख अनुभवणं हे नकोसे वाटायला लागते. तेव्हा शारीरिक सुखाच्या शोधात काही लोक दुसऱ्या पार्टनरसोबत रात्र घालवतात. त्या गोष्टीची सवय लागली की मग ते लोक सतत दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात.

प्रत्येकाची फँटसी वेगळी असते. जेव्हा जोडीदारांमध्ये रोमान्सबाबत समानता नसते, तेव्हा नात्यात लवकरच कंटाळा येतो. त्यामुळे ती व्यक्ती स्वतःच्या लैंगिक कल्पनेसाठी आणि विविधतेसाठी जोडीदाराची फसवणूक करून इतर कोणाशी तरी आपली इच्छा पूर्ण करू लागते.

सहावे कारण : बदला घेणे

आपल्या जोडीदाराकडून बदला घेण्यासाठी अनेक वेळा विचारपूर्वक विचार करून लोक फसवणूक करण्याचा निर्णय घेतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असता तेव्हा नातेसंबंधांमध्ये असे घडते, परंतु ज्या लोकांची फसवणूक होते. तेव्हा त्याने धोका दिला म्हणून मीही धोका देणार, असा विचार करून एक्स्ट्रा मॅरेटीअल अफेअर करणारेही अनेक लोक असतात.

सातवे कारण : त्रासदायक नातेसंबंध

जेव्हा एखादा व्यक्ती त्रासदायक वाटणाऱ्या नात्यात असतो. तेव्हा पार्टनरकडून कसलीच अपेक्षा नसते.  ना ते तुम्हाला आदर देतात ना काही विचार करतात. केवळ त्यांचे निर्णय लादणे आणि मानसिक, शारीरिक त्रास देणे इतकंच त्यांच नातं राहतं.

अशावेळी तो त्रास सहन होत नसल्याने लोक जोडीदाराची फसवणूक करतात. दुसऱ्या कोणात तरी गुंतून दिवसातील थोडावेळ का होईना  ते खूश राहतात.

त्रासदायक नातेसंबंध
त्रासदायक नातेसंबंधesakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com