नवी दिल्ली: देशभरात मंगळवारी संध्याकाळी ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) सेवा विस्कळीत झाल्यामुळे डिजिटल व्यवहारांना मोठा फटका बसला. तांत्रिक बिघाडामुळे अनेक लोकांना ऑनलाइन व्यवहार पूर्ण करण्यात अडचणी आल्या..‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, देशभरातून शेकडो लोकांनी तक्रार नोंदविली. व्यवहार अयशस्वी होणे आणि ॲप सुरू न होणे, अशा तक्रारी नोंदविण्यात आल्या. यूपीआय सेवेतील बिघाड हा नेटवर्क क्षमतेच्या कमतरतेमुळे झाल्याचे समजते..Amravati Student Scholarship Issue : अमरावतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गंडांतर ; महाविद्यालयांचा हलगर्जीपणा नडणार! .युपीआयद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना ‘पाठविण्यात आलेले पैसे युपीआय नेटवर्कच्या निश्चितीसाठी प्रतीक्षेत आहेत’ असा संदेश येत होता. तर काही ग्राहकांना ‘ज्याला पैसे पाठवत आहात, त्या बँकेचा सर्व्हर सध्या कार्यरत नाही’ असा संदेश दिसत होता. परिणामी किराणा दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स तसेच ऑनलाइन व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण झाले..Arjun Tendulkar Wedding: अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण; स्वत: वरबाप सचिन तेंडुलकरने केली पोस्ट.रात्री आठनंतर टप्प्याटप्प्याने युपीआय सेवा पूर्ववत होऊ लागल्याचे ग्राहकांनी सांगितले. मात्र युपीआय नेटवर्कमधील या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांकडून होतेय..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.