
BSNL Swadeshi 4G Towers Launch September 2025
esakal
BSNL Swadeshi 4G Network Stack : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला एक मोठी खुशखबर दिली आहे. २७ सप्टेंबरला बीएसएनएलचे स्वदेशी नेटवर्क स्टॅक लॉन्च केले आहे. यामुळे भारत स्वतःचे टेलिकॉम उपकरण तयार करणाऱ्या जगातील फक्त पाच देशांमध्ये सामील होईल.. ज्यामध्ये डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसोबत सामील होईल. ही बाब देशाच्या डिजिटल क्रांतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील लाखो लोकांना वेगवान इंटरनेटचा लाभ मिळेल आणि डिजिटल भारताचे स्वप्न साकार होईल.