
PM Modi’s Big Gift to Mumbai | One Ticket Travel with Mumbai One App
esakal
Step by Step guide for Mumbai One app: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता एकाच तिकिटात मेट्रो, मोनोरेल, लोकल आणि बसने प्रवास करता येणार आहे. ‘मुंबई वन’ ॲपच्या माध्यमातून ही सुविधा गुरुवारपासून (9 ऑक्टोबर) उपलब्ध झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या ॲपचे लोकार्पण केले. देशातील पहिले एकात्मिक वाहतूक ॲप असलेले ‘मुंबई वन’ (Mumbai One App) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विकसित केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर पहाटे 5 वाजल्यापासून डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.