'पीएम मोदी ऍप'ही ट्रेंडिंग

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : देशभरातील 93 टक्के जनतेने ऍप सर्वेक्षणात नोटबंदीला समर्थन केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकेतस्थळावर एका इन्फोग्राफिकद्वारे केला आहे.
दर मिनिटाला या नमो ऍपला चारशेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असल्याचाही उल्लेख संकेतस्थळावर केला आहे. हे सर्वेक्षण ज्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून केले गेले,ते ऍपदेखील आता गुगल प्ले स्टोअर,ऍपल ऍप स्टोअरमध्ये टॉप ट्रेडिंगमध्ये आले आहे.
"पीएम नरेंद्र मोदी' हे ऍप "ऍपल ऍप' स्टोअरमधून सर्वाधिक डाऊनलोड केलेले आहे. या ऍप ट्रेडिंग सर्वेक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे निरिक्षण केले गेले.

या पाहणीत नरेंद्र मोदींनी त्यांच्या ऍपवरून केलेल्या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी देशभरातील नागरिक मोफत डाऊनलोड करत होते. बहुतेक ठिकाणी केलेल्या पाहणीत ट्रेंडमध्ये पीएम मोदी ऍप सर्वाधिक डाऊनलोड होत असल्याचे दिसले.

नव्या नोटांचा निर्णय आठ नोव्हेंबरला जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी ऍप हे 18व्या क्रमांकवर आले होते. यानंतर नरेंद्रमोदींनी देशभरातील नागरिकांना या निर्णया सबंधी विचार घेताना चलनासबंधी,काळ्या पैशासबंधी आपली मते नोंदविण्याचे आवाहन केले होते. यामुळे प्रत्येक नागरिकाला अगदी सहज थेट मोंदींसमोर आपले मत व्यक्त करायची संधी मिळाल्याने ऍपला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

Web Title: PM Modi's App on Top of Apple's App Store in Downloads, Searches