तुमच्या खिशाला परवडणारा Poco M5 स्मार्टफोन लॉंच; जाणून घ्या खासियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poco m5 launched with 50 mp camera 5000mah battery check price specifications and features

तुमच्या खिशाला परवडणारा Poco M5 स्मार्टफोन लॉंच; जाणून घ्या खासियत

स्मार्टफोन ब्रँड Poco ने सोमवारी आपला नवीन Poco M5 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये Octacore MediaTek Helio G99 प्रोसेसरसह 128 GB स्टोरेज आणि 6 GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.58 चा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आणि 5,000mAh ची बॅटरी आहे. तसेच, फोनमध्ये 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. चला जाणून घेऊया फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि फीचर्स...

Poco M5 किंमत

हा फोन ब्लॅक, आइस ब्लू आणि यलो या तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. त्याच्या 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आणि 128 GB स्टोरेजसह 6 GB रॅमची किंमत 14,499 रुपये आहे. हा फोन 13 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. याशिवाय ICICI बँक क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूटही दिली जाईल. सवलतीनंतर, फोनचा 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांना आणि 128 जीबी स्टोरेजसह 6 जीबी रॅम व्हेरिएंट 12,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Poco M5 चे स्पेसिफिकीशन्स

फोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस IPS डिस्प्ले दिला आहे, जो 1,080x2,800 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. डिस्प्लेसोबत गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये Octacore MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. फोनमध्ये 2 जीबीची व्हर्च्युअल रॅमही उपलब्ध आहे.

हेही वाचा: Smartphones Launch : या आठवड्यात लॉन्च होऊ शकतात 'हे' स्मार्टफोन

Poco M5 कॅमेरा

फोनमध्ये सॅमसंग Isocell JN1 सह येणार्‍या 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह तीन मागील कॅमेरे आहेत. दुसरी लेन्स 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. मागील कॅमेरासह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सुविधा उपलब्ध नाही. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Poco M5 बॅटरी

POCO M5 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth v5, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक, 4G आणि हाय-रिस ऑडिओ सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Cyrus Mistry Death : कारच्या एअरबॅग्जही उघडल्या, मात्र...; समोर आले PHOTOS

Web Title: Poco M5 Launched With 50 Mp Camera 5000mah Battery Check Price Specifications And Features

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology