Microsoft: ...अन्यथा तुमचा लॅपटॉप धूळखात पडलाच म्हणून समजा; वाचा काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Windows

Microsoft: ...अन्यथा तुमचा लॅपटॉप धूळखात पडलाच म्हणून समजा; वाचा काय आहे प्रकरण

Microsoft ends support for Windows: मायक्रोसॉफ्टने Windows 7 आणि Windows 8.1 ला सपोर्ट देणे बंद केले आहे. तुम्ही जर अद्याप या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित लॅपटॉप वापरत असाल तर समस्या निर्माण होऊ शकते. कंपनी आता या ऑपरेटिंग सिस्टमसाठी कोणतेही सिक्योरिटी अपडेट जारी करणार नाही.

मायक्रोसॉफ्टने माहिती दिली होती की, १० जानेवारी २०२३ पासून Windows 7 आणि Windows 8.1 साठी कोणतेही सिक्योरिटी आणि टेक्निकल अपडेट जारी केले जाणार नाही. तसेच, येथून पुढे डेव्हलपरसाठी WebView2 चा सपोर्ट देखील मिळणार नाही. WebView2 च्या मदतीने डेव्हलपर अ‍ॅपला अपडेट करतात.

हेही वाचा: Apple: iPhone 15 ला विसरा! iPhone 16 मध्ये मिळणार हे अफलातून फीचर; पाहा डिटेल्स

गुगल क्रोम ब्राउजरचा मिळणार नाही सपोर्ट

गुगलने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात माहिती दिली होती की, Windows 7 आणि Windows 8.1 साठी गुगल क्रोम ब्राउजरचा सपोर्ट मिळणार नाही. विंडोज ७ आणि विडोज ८.१ मध्ये गुगल क्रोमच्या नवीन व्हर्जनचा सपोर्ट मिळणे देखील बंद होईल.

सिक्योरिटी अपडेट न मिळाल्याने ज्या लॅपटॉपमध्ये विंडोज ७ आणि विंडोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टम आहेत, ते हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकतात. तसेच, बगची देखील शक्यता आहे. वर्ष २०२१ च्या अखेरपर्यंत विंडोज ७ यूजर्सची संख्या जवळपास १०० मिलियन होती. त्यामुळे आता सर्व यूजर्सला विंडोजला अपडेट करावे लागेल.

हेही वाचा: Samsung: 8GB रॅमसह येणाऱ्या सॅमसंगच्या फोनची विक्री सुरू, अवघ्या ८ हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी

रिपोर्टनुसार, जगभरात विंडोज ११ च्या तुलनेत २७ मिलियन अधिक यूजर्स विंडोज एक्सपी, ७ आणि ८ वर काम करणाऱ्या लॅपटॉपचा वापर करतात. दरम्यान, तुम्ही जर Windows 7 आणि Windows 8.1 इस्टॉल असलेल्या लॅपटॉपचा वापर करत असाल तर त्वरित ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा. अन्यथा हॅकर्स लॅपटॉपमधील खासगी माहिती चोरू शकतात.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

टॅग्स :MicrosoftWindows