esakal | बंदी न घातलेल्या PubG आणि Zoom अ‍ॅपचे आहे चीनशी कनेक्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

pub G and zoom app

पबजी आणि झूम अ‍ॅप हे चिनी कंपन्यांचे असल्याचे सांगितलं जात आहे. असं असूनही त्यावर बंदी का घातली नाही. बॅन केलेल्या अ‍ॅपच्या यादीतून संबंधित अ‍ॅप बाहेर का असे प्रश्न विचारले जात आहे.

बंदी न घातलेल्या PubG आणि Zoom अ‍ॅपचे आहे चीनशी कनेक्शन 

sakal_logo
By
सकाळ

नवी दिल्ली - भारतात वापरल्या जाणाऱ्या चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये काही अ‍ॅप ट्रेंड होत आहेत. यात प्रामुख्याने पब जी आणि झूम अ‍ॅप यांचा समावेश आहे. पबजी आणि झूम अ‍ॅप हे चिनी कंपन्यांचे असल्याचे सांगितलं जात आहे. असं असूनही त्यावर बंदी का घातली नाही. बॅन केलेल्या अ‍ॅपच्या यादीतून संबंधित अ‍ॅप बाहेर का असे प्रश्न विचारले जात आहे. दोन्ही अ‍ॅपचं चीनशी कनेक्शन असलं तरी त्यांचे मालकी हक्क वेगवेगळ्या देशांचे असल्यानं त्यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. 

चीनने गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीनंतर भारताने मोठा निर्णय घेत 59 चायनिज अ‍ॅपवर बंदी घातली. यामध्ये टिकटॉक, हेलो अ‍ॅप, युसी ब्राउजर, शेअर इट यांसारख्या अ‍ॅपचा समावेश आहे. भारतात या अ‍ॅपचे कोट्यवधी युजर्स होते. टिकटॉकसारखे अ‍ॅप भारतात अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र आता या यादीत पबजी मोबाइल आणि झूम अ‍ॅप का नाहीत असा प्रश्न विचारला जात आहे. ही दोन्ही अ‍ॅप सध्या ट्रेंडमध्ये आहेत. या अ‍ॅपवरून अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात असून यावर का बंदी नाही असंही म्हटलं जात आहे.

हे वाचा - चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती

प्लेअर अननोन बॅटलग्राउंडस म्हणजेच पबजी हे पॉप्युलर अ‍ॅक्शन गेम अ‍ॅप आहे. दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी असलेल्या ब्ल्यू होलच्या सब्सिडिअरी कंपनीने हे तयार केलं आहे. पबजी गेम ही एका चित्रपटावर आधारित आहे. 2000 साली जपानी चित्रपट बॅटल रॉयल हा आला होता. त्यावरून प्रेरणा घेत पबजी गेम तयार करण्यात आली होती. 

पबजीवर बंदी घालण्याची मागणी होण्यामागे त्याचे चीन कनेक्शन हे आहे. जगातील सर्वाम मोठ्या गेम कंपन्यांपैकी टॅन्सेंट ही एक कंपनी चीनमधील आहे. टॅन्सेंट गेम्सने पबजी गेम चीनमध्ये लाँच करण्याची तयारी केली होती. तसंच पबजीमध्ये भागिदारीही खरेदी केली होती. मात्र पबजीवर चीनमध्ये बंदी घातली गेली. त्यानंतर चीनमध्ये एका नव्या नावाने ही गेम लाँच करण्यात आली. सध्या प्ले स्टोअरवर या गेमचा पब्लिशर टेन्सेन्ट गेम्स असंच दिसतं. पबजीची मालकी ही संमिश्र स्वरुपाची आहे.

हे वाचा - खरंच पृथ्वीचा विध्वंस करू शकतात का Asteroid ? जाणून घ्या

पबजीसोबतच झूम अ‍ॅपसुद्धा चर्चेत आलं आहे. लॉकडाऊननंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं. त्याचबरोबर शिक्षणही ऑनलाइन सुरु झालं. यासाठी व्हिडिओ कॉल, मिटिंग करण्यासाठी झूम अ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. झूम कम्यूनिकेशन ही एक अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक एरिक युआन यांचा जन्म चीनमध्ये झाला पण त्यांचे नागरिकत्व अमेरिकन आहे. त्यांच्या चीनमधील जन्मामुळे झूमसुद्धा चीनी कंपनी आहे की काय असा प्रश्न विचारला जात आहे. 

भारताने ज्या अ‍ॅपना ब्लॉक केलं आहे त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट, युसी ब्राउजर, लाइकी, एमआय कम्युनिटी, क्लब फॅक्टरी, बायडु मॅप, हॅलो, युसी न्यूज, बिगो लाइव्ह, एम आय व्हिडिओ कॉल, शाओमी यासह जवळपास 59 अ‍ॅपचा समावेश आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने सांगितलं की, आम्हाला काही सूत्रांनी आणि रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सचा डेटा चोरी केला जात असल्याची आणि भारताबाहेर असलेल्या सर्व्हरवर तो पाठवला जात असल्याची माहिती मिळाली होती.