Online Task Fraud : ऑनलाईन कामातून पैशांचं आमिष.. पुण्यातील मॅनेजर, सॉफ्टवेअर इंजिनिअर अन् सहा जणांना 1.04 कोटींचा चुना!

Pune Cyber Crime : वाकडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या व्यक्तीने यात तब्बल 30,20 लाख रुपये गमावले आहेत. तर थेरगावमधील एका 24 वर्षीय तरुणीची देखील अशाच प्रकारे 2.88 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
Online Job Scam
Online Job ScameSakal

Pune Online Job Scam : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुरूवारी ऑनलाईन फ्रॉड प्रकरणी आठ एफआयआर दाखल झाल्या. आठ जणांची ऑनलाईन फसवणूक करून, त्यांच्याकडून तब्बल 1.04 कोटी रुपये उकळण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. याबाबत गेल्या वर्षीपासून विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. व्हेरिफिकेशन केल्यानंतर आता या सर्व तक्रारींचं रुपांतर एफआयआरमध्ये करण्यात आलं आहे.

यातील बहुतांश पीडितांना ऑनलाईन सोपी कामं करुन भरपूर पैसे मिळवण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. वाकडमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या व्यक्तीने यात तब्बल 30,20 लाख रुपये गमावले आहेत. तर थेरगावमधील एका 24 वर्षीय तरुणीची देखील अशाच प्रकारे 2.88 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. (Online Job Scam)

याव्यतिरिक्त कॅम्प, भारतीय विद्यापीठ, कोथरुड, चतुःश्रुंगी, लोणीकंद आणि मुंढवा या भागांमधील सहा जणांची देखील अशीच फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक गृहिणी, एक खासगी फर्म मॅनेजर, एका कंपनीतील अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांकडून मिळून 72.05 लाख रुपये उकळण्यात आले होते. (Pune Cyber Crime Update)

Online Job Scam
Online Gaming Safety Tips : ऑनलाईन गेमर्सना केंद्राने दिला गंभीर इशारा, सुरक्षेसाठी दिल्या महत्त्वाच्या टिप्स!

वाकडमधील इंजिनिअरला ऑनलाईन पार्ट-टाईम जॉबबाबत मेसेज आला होता. त्यांनी मेसेजला रिप्लाय केल्यानंतर त्यांना एक मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आलं, आणि विविध प्रकारचे ऑनलाईन टास्क देण्यात आले. यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली, आणि रिटर्नमध्ये 40 लाख रुपये मिळतील असंही सांगण्यात आलं. त्यानंतर थोडे-थोडे करून त्यांनी 30 लाख रुपये हॅकर्सना पाठवले. मात्र, जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा पलीकडून मेसेजची उत्तरं येणे बंद झालं. (Pune Engineer Scammed)

इतर सर्वांना देखील थोड्याफार फरकारने अशाच प्रकारचे अनुभव आले. या सर्व प्रकरणांमध्ये बँक, ई-वॉलेट्स आणि सोशल मीडिया साईट्सशी संपर्क साधण्यात आला असून, तपास वेगाने सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली. चॅट्स, ट्रान्झॅक्शन डीटेल्स अशी माहिती मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Online Job Scam
Cyber Security : एआय अ‍ॅप्स आणि स्मार्ट होममुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका; रिपोर्टमध्ये बाब उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com