
इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब या आधीपासूनच स्पर्धेत आहेत. बजाज चेतक एकदा चार्जिंग केल्यास इको मोडवर जवळपास 95 किमी इतकी धावू शकते.
नवी दिल्ली - देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यामुळेच सध्याच्या वाहन निर्मिती कंपन्यांशिवाय नव्या कंपन्यासुद्धा या क्षेत्रात उतरत आहेत. यातच आता हैदराबादमधील स्टार्टअप कंपनी प्युअर ईव्हीने नवी हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची तयारी केली आहे. नव्या स्कूटरचे नाव एंट्रेस निओ असं ठेवण्यात आलं आहे. ही स्कूटर अधिकृतपणे 1 डिसेंबरला लाँच केली जाणार आहे.
विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब या आधीपासूनच स्पर्धेत आहेत. बजाज चेतक एकदा चार्जिंग केल्यास इको मोडवर जवळपास 95 किमी इतकी धावू शकते. तर स्मार्ट मोडवर 85 किमी धावेल असा दावा कंपनीने केला आहे. तर टीव्हीएस आयक्यूब फुल चार्जिंग असल्याच 75 किमी पर्यंत धावू शकते. त्यामुळे या गाड्यांच्या तुलनेत प्युअर ईव्हीची एंट्रेस निओ जास्त धावत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आता बाजारात गाडी लाँच झाल्यानंतर प्रत्यक्षात कसा प्रतिसाद मिळतो हे पहावं लागणार आहे.
हे वाचा - नव्या Hyundai i20 चा धमाका; फक्त 20 दिवसांत 20 हजार कार बूक
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये 1.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी किंवा 2.2 किलोवॅट पीक BLDC मोटर असणार आहे. तसंच 5 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग पकडू शकते असा दावाही कंपनीने केला आहे. इको मोडमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर 120 किमी पर्यंत धावू शकते. कंपनीने सध्या बाजारात असेलल्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा एट्रेंस निओ अधिक दमदार असल्याचा दावा केला आहे. तसंच या गाडीची किंमत 75 हजार 999 रुपये असल्याचंही आधीच जाहीर करण्यात आलं आहे.
हे वाचा - Hyundai आणणार स्वस्तातली मिनी SUV कार
नव्या स्कूटरबाबत सांगताना कंपनीचे सहसंस्थापक विकास म्हणाले की, नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेगाने पिकअप घेणं आणि जास्त अंतर धावण्याची क्षमता आहे. कंपनीने नुकतंच नेपाळसोबत काही प्रोडक्ट लाँच केली आहेत.