Quick Heal New CEO: विशाल साळवी यांची क्विक हील टेक्नोलॉजीजच्या सीईओपदी नियुक्ती

New Quick Heal CEO: सायबर सुरक्षितता व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांचा २९ वर्षांचा अनुभव
Quick heal
Quick healEsakal

Vishal Salvi appointed as a CEO: क्विक हील टेक्नोलॉजीज या आघाडीच्या जागतिक सायबर सुरक्षितता उत्पादने पुरवणाऱ्या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर विशाल साळवी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यापूर्वी इन्फोसिसमध्ये वरिष्ठ पदावर काम केलेल्या साळवी यांच्याकडे सायबर सुरक्षितता व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांचा भारतातील व जागतिक स्तरावरील २९ वर्षांचा अनुभव आहे.

क्विक हील टेक्नोलॉजीजमध्ये रुजू होण्यापूर्वी साळवी यांनी इन्फोसिस लिमिटेडमध्ये ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, सायबर सिक्युरिटी सर्व्हिस लाइनचे बिझनेस प्रमुख व वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण इन्फोसिस समूहात माहिती व सायबर सुरक्षितता धोरणांना आकार देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.

पीडब्ल्यूसी, एचडीएफसी बँक, स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ग्लोबल ट्रस्ट बँक, डेव्हलपमेंट क्रेडिट बँक व क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज अशा अनेक कंपन्यांमध्ये नेतृत्वाच्या पदांवर काम करताना साळवी यांची सायबर सुरक्षितता व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील कौशल्ये जोपासली गेली आहेत.

क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर डॉ. कैलास काटकर कायम राहणार आहेत. कंपनीच्या लक्षणीय वाढीमध्ये व यशामध्ये डॉ. काटकर यांच्या नेतृत्वाची भूमिका मोठी आहे. त्यांच्या द्रष्ट्या मार्गदर्शनाखाली, क्विक हीलने, २०१५ मध्ये, “सिक्योराइट” हा मान्यताप्राप्त ब्रॅण्ड आणून आपले कार्यक्षेत्र उद्योजक सायबर सुरक्षिततेच्या क्षेत्रात विस्तारले.

Quick heal
Ajit Agarkar : भावी तेंडुलकर ते बॉम्बे डक, अजित आगरकरचं क्रिकेट करियर एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही

नवीन नियुक्तीबद्दल डॉ. कैलास काटकर म्हणाले, "मी विशाल साळवी यांचे क्विक हील परिवारात स्वागत करतो. ठोस सायबरसुरक्षितता उत्पादने देण्यासाठी आमच्या टीमने अविरत काम केले आहे आणि संबंधितांसाठी आम्ही निर्माण केलेल्या लक्षणीय व्यवसाय मूल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.

ग्राहककेंद्री धोरण व नवोन्मेष हे आमचे प्रेरक घटक असल्यामुळे, क्विक हील व्यक्ती, संस्था व राष्ट्रांना सुरक्षित करण्याचे काम अविरत करत राहील, असा आत्मविश्वास मला वाटतो. विशाल साळवी हे आमचे सीईओ झाल्यामुळे आता भारतातील सायबरसुरक्षितता परिसंस्थेचा कायापालट करण्यासाठी तसेच जागतिक नकाशावरील आमचे स्थान अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."

Quick heal
Ajit Pawar Latest News : शपथविधीला अजित पवारांसोबत पण शरद पवारांना वडील मानणाऱ्या 'या' महिला आमदार नॉट रिचेबल

विशाल साळवी या नियुक्तीबद्दल म्हणाले, "क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे हाती घेणे माझ्यासाठी खूपच सन्मानाचे आहे. क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडने सायबरसुरक्षितता उद्योगात एक विश्वासार्ह आघाडीची कंपनी म्हणून मोठा लौकिक कमावला आहे आणि या अत्युत्कृष्ट टीमचे नेतृत्व करायला मिळणार म्हणून मी उत्साहित आहे.

सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर तसेच डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्यामुळे, ‘सायबरसुरक्षितता हा सर्वांचा मुलभूत हक्क’ करण्याप्रती मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. वाढीला चालना देण्यासाठी, नवोन्मेषाची संस्कृती जोपासण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांना व संबंधितांना अजोड मूल्य पुरवण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही सगळे मिळून, सर्वांसाठी सायबर-सुरक्षित अशा जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करू."

Quick heal
Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com