Cosmic Event India : उद्यापासून आकाशात लागणार ग्रहांची परेड; ६ ग्रह येतील एका रेषेत, वाचा कसा पाहता येईल हा ग्रहसंयोग

Planetary Parade : जून ३ पासून सूर्योदयापूर्वी ग्रहसंयोग पाहता येणार ग्रहसंयोग ; तज्ज्ञांची माहिती
Sky Gazer's Delight: Six-Planet Alignment Visible from India
Sky Gazer's Delight: Six-Planet Alignment Visible from Indiaesakal

Six Planets India : खगोलशास्त्राच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दुर्मीळ असा ग्रहसंयोग उद्यापासून आकाशात दिसून येणार आहे. जून ३, २०२४ ही या ग्रहसंयोगाची सर्वोत्तम वेळ असली तरी, याआधी आणि यानंतरही काही दिवस हा नजारा पाहायला मिळणार आहे.

ग्रहसंयोग म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्यमालेतील ग्रह एका रांगेत किंवा जवळजवळ एका रांगेत असल्यासारखे दिसतात. हा संयोग वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. यावेळी बुध, गुरू, शनी, मंगळ, युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एकत्र येणार आहेत.

बेंगलोरच्या भारतीय खगोल भौतिक संस्थेच्या म्हणण्यानुसार, जून ३ ची तारीख जवळ येईपर्यंत गुरू सूर्याच्या आणखी जवळ येईल, तर त्याची जागा नंतरच्या काही दिवसात बुध घेईल.

Sky Gazer's Delight: Six-Planet Alignment Visible from India
NASA ने शेअर केले Black Hole चे 'हे' फोटो पाहून व्हाल थक्क

पण सूर्योदयाआधी ग्रह क्षितिजाच्या जवळ असल्याने त्यांना पाहणे थोडे कठीण जाऊ शकते. या संयोगात पूर्वेकडील आकाशात शनी हा तेजस्वी दिव्यप्रकाश दिसून येईल. त्याच्या खाली मंगळ लाल रंगात दिसणार आहे. यासोबतच अर्धचंद्राच्या स्वरुपातील चंद्रही दिसून येणार असून हा नजारा आणखीन हेरावून टाकणारा असेल.

हे ग्रह कधी दिसतील?

सूर्योदयाच्या सुमारे २० मिनिटं आधी गुरू आणि मंगळ दिसतील, तर बुध पूर्व क्षितिजाच्या १० अंशांपेक्षा कमी अंतरावर असेल. युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह मंद प्रकाशाचे असल्याने ते डोळ्यांना दिसणार नाहीत. तर शुक्र ग्रह सूर्याच्या इतक्या जवळ असेल की तो सूर्यप्रकाशामुळे दिसणार नाही.

या संयोगादरम्यान ग्रह नेहमीपेक्षा मोठे दिसणार नाहीत. हे ग्रह एका रेषेत नसून त्यांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या (Ecliptic) जवळपासून थोड्याशा झुकलेल्या असेही दिसू शकते.

Sky Gazer's Delight: Six-Planet Alignment Visible from India
Whatsapp New Feature : व्हॉट्सअपने व्हॉइस स्टेटसचं फिचर केल अपग्रेड,आता वाढणार टाईम लिमिट

हे दृश्य भारतात कुठे पाहायला मिळेल?

तज्ज्ञांच्या मते, सूर्योदयापूर्वी हवामान चांगले,साफ असल्यास हा ग्रहसंयोग संपूर्ण भारतातून दिसू शकतो. या आठवड्यात दररोज सूर्योदयापूर्वी थोडा वेळ हा ग्रहसंयोग पाहता येऊ शकतो. आपल्या सूर्यमालेतील ग्रह एकत्र येण्याचा हा अद्भुत नजारा नक्कीच अचंबित करणारा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com