ATM मधून आता स्मार्टफोन वापरुन काढता येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rbi new cardless cash withdrawn service and withdraw cash without your debit-credit-card know details

ATM मधून आता स्मार्टफोन वापरुन काढता येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस

RBI New Cash Without Card Service 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सुरक्षित व्यवहारांसाठी कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सुरू केली आहे. या प्रक्रियेत, वापरकर्ते डेबिट आणि क्रेडिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतील. यामुळे कार्ड फसवणूक रोखण्यास मदत होईल. तसेच, वापरकर्ते त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड घरी विसरल्यास एटीएममधून पैसे काढू शकतील.

यामध्ये मोबाईल फोन वापरून एटीएममधून पैसे काढता येतात. मोबाईल ऑथेंटिकेशनद्वारे पैशांचे व्यवहार करता येतील, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. पण कार्डलेस कॅश काढण्याची प्रणाली आल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून पैसे काढण्याची सुविधा बंद केली जाणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

काय असेल सुविधा

कॅश काढण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यकता असणार नााहीये. तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीतही सूट मिळणार आहे. कार्ड सुविधेशिवाय रोख रकमेसाठी, वापरकर्त्यांना रजिस्टर्ड मोबाइल आणि UPI आयडीशी स्मार्टफोन जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा: PM पदावरुन हकालपट्टीनंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

कार्डशिवाय पैसे कसे काढायचे

  • कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी वापरकर्त्याला UPI आयडीची आवश्यकता असेल. यानंतर व्यवहाराचे UPI द्वारे ऑथेंटिकेट करावे लागतील.

  • जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी एटीएम स्क्रीनवर दाखवलेला कार्डलेस विथड्रॉल पर्याय निवडावा लागेल.

  • यानंतर एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. हा QR UPI अॅपच्या मदतीने स्कॅन करावा लागेल.

  • यानंतर यूजर्सला UPI पिन टाकावा लागेल. यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.

टीप - कार्डलेस रोख पैसे काढण्याची सुविधा सध्या काही बँकांवर उपलब्ध आहे जसे की ICICI आणि SBI बँक. ही सुविधा लवकरच इतर बँकांच्या एटीएममध्येही सुरू करण्यात येणार आहे. तसेच थर्ड पार्टी अॅपवरून एटीएममध्ये प्रवेश करता येतो.

हेही वाचा: Video : इंधन दरवाढीबाबत स्मृती इराणींना जेव्हा काँग्रेस नेत्याने घेरलं..

Web Title: Rbi New Cardless Cash Withdrawn Service And Withdraw Cash Without Your Debit Credit Card Know Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ATMUPI
go to top