Tokenisation : 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट/डेबिट कार्ड नियमांत बदल, वाचा नाही तर बसेल मोठा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New RBI rule

Tokenisation : 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट/डेबिट कार्ड नियमांत बदल, वाचा नाही तर बसेल मोठा फटका

Tokenisation: येत्या एक ऑक्टोबरपासून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या काही नियमांत बदल होणार आहे. या बदलानुसार रिजर्व बँक ऑफ इंडियाचा कार्ड ऑन फाइल टोकनायझेशन नियम अमलात आणल्या जाणार आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या मते टोकनायझेशन सिस्टिम अमलात आणल्यानंतर कार्ड होल्डर्सच्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. तुम्ही टोकनायजेशन केले नसल्यास तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार नाही.

तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड ट्रँझॅक्शन आधीच्या तुलनेत जास्त सुरक्षित होईल. अनेक युजर्सला टोकनायजेशन संदर्भात त्यांच्या मोबाईलवर मॅसेजही यायला लागले आहेत. मात्र अनेकांना अजूनही नेमकं टोकनायझेशन काय आहे हे कळलेलं नाही. चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

काय आहे टोकनायझेशन?

जेव्हाही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड होल्डर पॉईंट ऑफ सेल मशिन किंवा ऑनलाईन अॅपद्वारे त्यांच्या कार्डद्वारे पेमेंट करेल तेव्हा त्यांचे कार्ड डिटेल्स इनक्रिप्टेड टोकन्सच्या रुपात स्टोअर होतील. आधी हा नियम १ जानेवारीपासून लागू होणार होता. आरबीआयने वेगवेगळ्या पक्षांकडून घेतलेल्या मतांनंतर कार्ड ऑन फाइल डेटा स्टोअर करण्याचा कालावधी वाढवत ३० जून २०२२ केलाय. नंतर हा कालावधी ३० सप्टेंबर करण्यात आला. त्यामुळे आता जे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड होल्डर्स १ ऑक्टोबरपासून टोकनायझेशन करणार नाहीत त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून किंवा ई-कॉमर्स वेबसाईटवरून पेमेंट करता येणार नाही.

हेही वाचा: Debit Cardवर मिळणार 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा!

नव्या नियमांनुसार होल्डर्सला होईल फायदा

बहुतेक बड्या उद्योजकांनी बँक टोकनायजेशनच्या नव्या नियमांचा स्वीकार केलाय. आतापर्यंत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या बदल्यात १९.५ कोटी टोकर जारी करण्यात आले आहेत. माहितीसाठी आता रिजर्व बँकने पेमेंट कंपन्यांना ग्राहकांचा डेबिट आणि क्रेडिट कार्ड डेटा सेव करण्यास मनाई केली आहे. पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात ऑप्शनल कोड द्यावा लागेल ज्याला टोकन असं नाव दिल्या जाईल. हे टोकन लागू झाल्यानंतर होल्डर्सला ऑनलाईन पेमेंटसाठी थेट कार्डऐवजी यूनिक टोकन वापरावे लागेल. यामुळे पेमेंट करणं आणखी सोपं होईल

हेही वाचा: एज्युकेशन लोन, PF रकमेपेक्षा फायदेशीर आहे Student Credit Card

असे करा डेबिट आणि क्रेडिट कार्ड टोकनायजेशन

सगळ्यात आधी ई-कॉमर्स वेबसाइटचं किंवा अॅप ओपन करा. आता कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी सिलेक्ट करा आणि पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.

चेकआउट करताना आधी सेव्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरावी.

आता तुम्हाला Secure Your App As Per RBI Guidelines किंवा Tokanization Your Card As Per RBI Guidelines ऑप्शन येईल. या ऑप्शनला सिलेक्ट करा.

आता तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल. ओटीपी सबमिट करून ट्रँझॅक्शन कम्पिल करा.

इथेच तुम्हाला जनरेट टोकनचं ऑप्शन मिळेल. त्याला सिलेक्ट करा. हे करताच टोकन जनरेट होईल आणि तुमच्या कार्डच्या माहितीऐवजी टोकन त्याचवेळी तुमच्या अॅप किंवा वेबसाईटवर सेव्ह होईल.

आता तुम्ही परत त्याच वेबसाईट किंवा अॅपवर गेल्यास तुम्हाला सेव्ड टोकन कार्डच्या शेवटी लास्ट चार डिजिट दिसेल. हे चार डिजीट तुम्हाला पेमेंट करतेवेळी तुमचं फेवरेट कार्ड सिलेक्ट करण्याची सवलत देईल.