Realme चे 2 नवे फोन लॉंंच, किंमत 14,999 रुपयांपासून सुरू, पाहा फीचर्स

realme 9 5g and realme 9 5g se launched in india check price specifications
realme 9 5g and realme 9 5g se launched in india check price specifications

Realme India ने आपले दोन नवीन स्मार्टफोन Realme 9 5G आणि Realme 9 5G SE भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. Realme च्या या दोन्ही फोनमध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह तीन रियर कॅमेरे दिले आहेत आणि दोन्ही फोनमध्ये 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर Realme 9 5G मध्ये MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर आहे, तर Realme 9 5G SE मध्ये Snapdragon 778G 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे ज्यासोबत स्मार्ट 5G पॉवर सेव्हिंग देखील दिले आहे.

Realme 9 5G, Realme 9 5G SE ची किंमत

Realme 9 5G च्या 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 14,999 रुपये आहे, तर 6 GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला रु. 1,500 ची सूट मिळेल. हा फोन 14 मार्चपासून फ्लिपकार्ट वरून Meteor ब्लॅक आणि Stargaze व्हाईट रंगात खरेदी करता येईल.

Realme 9 5G SE च्या 6 GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 19,999 रुपये आहे आणि 8 GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरियंट ची किंमत 22,999 रुपये आहे. यासोबतच ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची सूट मिळेल. हा फोन Flipkart वरून 14 मार्चपासून Azure Glow आणि Starry Glow कलरमध्ये खरेदी करता येईल.

realme 9 5g and realme 9 5g se launched in india check price specifications
Maruti ची आणखी एक CNG कार लॉंच, देते जबरदस्त मायलेज; पाहा किंमत

Realme 9 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 5G मध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे. फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 600 nits आहे. याला MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 6 GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम मिळेल.

Realme 9 5G मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स मोनोक्रोम आहे आणि तिसरी लेन्स मॅक्रो आहे. त्यांच्या मेगापिक्सलबाबत माहिती देण्यात आलेली नाही. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/A-GPS सारखे सेन्सर आहेत. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 18W क्विक चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे. फोनचे वजन 199 ग्रॅम आहे.

realme 9 5g and realme 9 5g se launched in india check price specifications
स्वस्तात खेरदी करा Redmi Note 11 Pro + 5G फोन; मिळतेय बंपर सूट

Realme 9 5G SE चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9 5G SE मध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे. फोनमध्ये 1080x2412 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 600 nits आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर 8 GB पर्यंत LPDDR4X RAM सह 5 GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम मिळेल.

Realme 9 5G SE मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स मोनोक्रोम आहे आणि तिसरी लेन्स मॅक्रो आहे. त्यांच्या मेगापिक्सलबाबत माहिती देण्यात आलेली नाही. सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.

Realme 9 5G SE मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS / A-GPS सारखे सेन्सर आहेत. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 18W क्विक चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे. फोनचे वजन 199 ग्रॅम आहे.

realme 9 5g and realme 9 5g se launched in india check price specifications
रशियाला जगभरातून विरोध; युक्रेनच्या लष्करात दाखल झाले २० हजार परदेशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com