Airtel, Vodafone-Idea ला दणका, ट्रायने या युजर्सचे प्लॅन केले ब्लॉक

सूरज यादव
सोमवार, 13 जुलै 2020

दोन्ही कंपन्या या प्लॅनमध्ये युजर्सना वेगवान इंटरनेट आणि सेवेला प्राधान्य देत होते. हा प्लॅन असलेल्या युजर्सना इतर युजर्सच्या तुलनेत चांगल्या सुविधा दिल्या जात होत्या. 

नवी दिल्ली - टेलिकॉम रेग्युलेटरकडून भारती एअरटेलचा प्लॅटिनम प्लॅन आणि व्होडाफोन-आयडियाचा रेडएक्स प्रिमियम प्लॅन ब्लॉक केला आहे. दोन्ही कंपन्या या प्लॅनमध्ये युजर्सना वेगवान इंटरनेट आणि सेवेला प्राधान्य देत होते. हा प्लॅन असलेल्या युजर्सना इतर युजर्सच्या तुलनेत चांगल्या सुविधा दिल्या जात होत्या. ट्रायने या प्लॅनला ब्लॉक करताना म्हटलं की, प्रिमियम प्लॅनमुळे त्या ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो ज्यांच्याकडे तो प्लॅन नाही. 

व्होडाफोन - आयडियाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं की, टेलिकॉम ऑपरेटर प्लॅन ब्लॉक केल्यामुळे हैराण झाले आहेत. त्यांना आठवड्याभरात यावर कारवाई करण्यास सांगण्यात आलं आहे. ट्रायने त्यांना उत्तर देण्याची संधीसुद्धा दिली नाही. मात्र याचा असा अर्थ नाही की कोणत्याही प्रकारचे प्रिमियम सर्व्हिसचे प्लॅन युजर्सना मिळणार नाहीत.

हे वाचा - टिकटॉकसारखेच असलेले भारतीय 'टॉप १०' अ‍ॅप्स आले आहेत, त्या अ‍ॅप्स विषयी सविस्तर वाचाच

ट्राय इंडियान सांगितलं की, अशा प्रकारच्या प्लॅनचा परिणाम इतर युजर्सना मिळणाऱअया सेवेवर पडतो एवढंच नाही तर नेट न्यूट्रिलिटी रूल्स कायम ठेवण्यासाठी आव्हानात्मक होतं. दोन्ही कंपन्या पब्लिक डेटा हायवेवर एक वेगळी लेन तयार करत होत्या. ज्या पब्लिक रिसोर्सेसचा वापर करतात. अशा प्रकारे श्रीमंत युजर्सना इतरांच्या तुलनेत चांगल्या सेवा देण्याची ऑफर दिली होती. 

हे वाचा - एकाच फोनमध्ये दोन WhatsApp वापरायचं? तर मग हे वाचा

याआधी दोन्ही कंपन्यांना ट्रायकडून पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यात म्हटलं होतं की, तात्काळ हे प्लॅन बंद करण्यात यावेत. कारण रेग्युलेटर दोन्ही स्कीम्सची सविस्तर चौकशी केली जात आहे. कंपन्यांना असंही सांगण्यात आलं होतं की , त्या युजर्सना प्रमोशनल सर्विसेस मिळत रहाव्यात ज्यांनी याआधी रिचार्ज केला आहे. आता एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या या प्रिमियम प्लॅन्सना ब्लॉक करण्यास सांगण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trai block airtel premium and vodafone idea red x plans