Realme GT 2 Series
Realme GT 2 Series

Realme ने लॉंच केली GT 2 सीरीज; पाहा किंमत इतर डिटेल्स

Realme ने Realme GT 2 सीरीजमधील दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, ज्यात Realme GT 2 आणि Realme GT 2 Pro यांचा समावेश आहे. हे दोन्ही फोन फ्लॅगशिप प्रोसेसर आणि फ्लॅगशिप फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये LTPO OLED डिस्प्लेसह Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2K आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे.

Realme GT 2, Realme GT 2 Pro ची किंमत

Realme GT 2 च्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची व्हेरिएंटची किंमत 2,699 चीनी युआन म्हणजे सुमारे 31,700 रुपये आहे. त्याच वेळी, 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,899 युआन म्हणजे सुमारे 34,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 12 GB आणि 256 GB स्टोरेजमध्ये देखील सादर केला गेला आहे, ज्याची किंमत 3,199 युआन म्हणजे सुमारे 37,400 रुपये आहे. हे पेपर ग्रीन, पेपर व्हाइट, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Realme GT 2 Pro ची किंमत 3,899 युआन म्हणजे सुमारे 45,600 रुपये आहे. हा फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट, स्टील ब्लॅक आणि टायटॅनियम ब्लू रंगातही उपलब्ध करण्यात आला आहे. Realme GT Neo 2 चे स्पेशल एडिशन ड्रॅगन बॉल Z देखील लॉन्च केले गेले आहे, ज्याची किंमत 2,999 युआन म्हणजेच सुमारे 34,200 रुपये आहे.

Realme GT 2 Series
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 मध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.62-इंचाचा फुल HD+ E4 AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आहे. याशिवाय हीट डिसिपेशन टेक्नोलॉजी आणि स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग देखील देण्यात आले आहे. हे फोन 3 अंश सेल्सिअस पर्यंत थंड करू शकते.

Realme GT 2 कॅमेरा

Realme GT 2 मध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सेल असून ती Sony IMX776 सेन्सर आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आहे. फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme GT 2 ची बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, ब्लूटूथ 5.2 आणि NFC साठी सोपोर्ट दिला आहे. यात 65W चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी आहे.

Realme GT 2 Series
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर 2.5 लाखांची सूट; पाहा डिटेल्स

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 2 Pro मध्ये 6.7-इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. फोनची ब्राइटनेस 1,400 nits आहे. त्याच्या डिस्प्लेला DisplayMate कडून A+ सर्टिफिकेट मिळाले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आला आहे. फोनमध्ये अडव्हांस मॅट्रिक्स अँटेना सिस्टीम दिली आहे ज्यामुळे चांगले नेटवर्क, Wi-Fi 6, 5G आणि NFC कनेक्टिव्हिटी असल्याचा दावा केला जातो. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिले असून 12 GB आणि 512 GB पर्यंत RAM आहे.

Realme GT 2 Pro चा कॅमेरा

फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्याचा पहिली लेन्स 50-मेगापिक्सेल Sony IMX 766 सेन्सर आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन देखील आहे. यातील दुसरा लेन्स 50 मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड अँगलची आहे. तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल मॅक्रो आहे.

Realme GT 2 Pro बॅटरी

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, Bluetooth 5.2 आणि NFC सपोर्ट दिला आहे. यात तुम्हाला 65W चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच फोनचे वजन 189 ग्रॅम आहे.

Realme GT 2 Series
भारीच! Gmail वर ऑटोमॅटिक डिलीट होतील नको असलेले ईमेल; पाहा प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com