Realme GT 6T : फक्त 12 हजारांत मिळतोय Realme GT 6T मोबाईल; ब्रँड लुक अन् कॅमेरा फीचर्स, सर्व ऑफर्स वाचा एका क्लिकवर

Realme GT 6T Smartphone Discount Offer Amazon : रियलमी GT 6T स्मार्टफोन आता अमेझॉनवर फक्त १२,५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आकर्षक ऑफर्स आणि एक्सचेंज डील्सचा फायदा घेऊन तुमचा स्मार्टफोन खरेदी करु शकता.
Realme GT 6T Smartphone Discount Offer Amazon
Realme GT 6T Smartphone Discount Offer Amazonesakal
Updated on

Realme GT 6T Mobile Discount Offer : रियलमीचा लोकप्रिय स्मार्टफोन रियलमी GT 6T भारतीय बाजारात गेल्या वर्षी वर्षी मे महिन्यात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त फीचर्समुळे तो गेमिंग आणि इतर कामांसाठी एकदम भारी होता. आता अमेझॉनवर हा मोबाईल मोठ्या डिस्काउंटने विकला जात आहे. तुम्हाला जर असा स्मार्टफोन हवा असेल जो मल्टीटास्किंग आणि जास्त अ‍ॅप्स सहजपणे हाताळू शकेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते.

रियलमी GT 6T सवलत ऑफर

रियलमी GT 6T च्या लाँचिंग किमतीची तुलना करता आता तो अमेझॉनवर खूप मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. सुरुवातीला 32,999 रुपयांच्या किमतीत लाँच झालेला रियलमी GT 6T, आता 19% सवलतीसह फक्त 28,998 रुपयांमध्ये मिळत आहे. या ऑफरचा लाभ 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरियंटसाठी उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला काही बँक ऑफर्स आणि कूपन सुद्धा मिळू शकतात.

बँक ऑफर्स आणि कूपन

या स्मार्टफोनवर तुम्हाला बँक ऑफर्सचा अतिरिक्त फायदा देखील मिळू शकतो. एक निवडक बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळू शकते. त्याचबरोबर, सर्व वापरकर्त्यांसाठी 5 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट देखील उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन जवळपास 22,498 रुपयांमध्ये मिळवू शकता.

Realme GT 6T Smartphone Discount Offer Amazon
Vivo X200 Ultra: आयफोनसारखा ब्रँड कॅमेरा; 200 मेगा पिक्सेल लेन्स, लाँच होणार Vivo X200 Ultra स्मार्टफोन, किंमत फक्त...

एक्सचेंज ऑफर

अमेझॉनवर एक एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे ज्यात तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनची देवाण-घेवाण करून 27,350 रुपयांपर्यंत बचत करू शकता. म्हणजे तुमच्या जुन्या डिव्हाइसवर 15 हजार रुपये मिळवले तरी तुम्ही रियलमी GT 6T फक्त 12,350 रुपयांमध्ये मिळवू शकता. पण यामध्ये तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवरून डिव्हाइसची किंमत ठरते.

रियलमी GT 6T स्पेसिफिकेशन्स

रियलमी GT 6T मध्ये प्लास्टिक बॅक पॅनल आणि फ्रेम असून त्याला प्रीमियम फील देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. याला IP65 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे ते धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.

Realme GT 6T Smartphone Discount Offer Amazon
Google Safety Tips : अलर्ट! मोबाईल मधलं गुगल तुमच्या गप्पा ऐकतंय, डेटा लिक होण्याआधी बंद करा 'ही' 1 सेटिंग, नाहीतर होणार मोठं नुकसान

या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाची AMOLED डिस्प्ले आहे, ज्याची रिफ्रेश रेट 120Hz आहे. यामध्ये HDR सपोर्ट आणि 600 निट्सपर्यंत पिक ब्राइटनेस देखील उपलब्ध आहे. याच्या ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलच्या सेन्सर्ससह, तसेच 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फीज आणि व्हिडीओ कॉल्ससाठी बेस्ट आहे.

रियलमी GT 6T मध्ये Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर आहे, जो स्मूथ परफॉर्मन्स देतो. यात 5500mAh ची बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला पटकन चार्ज करू शकता.

तुम्हाला जर एक उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारा स्मार्टफोन हवा असेल तर रियलमी GT 6T एक उत्तम पर्याय आहे. त्यावर मिळणार्‍या ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही तो आणखी स्वस्त दरात खरेदी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com