

CBI Porn Video Email Truth or Scam
sakal
सध्या डिजिटल क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे आणि प्रगतीही होत आहे. ऑनलाईन जगात होणारे जलद बदल आणि त्यासोबत वाढणाऱ्या डिजिटल फसवणुकींचा धोका देखील वाढला आहे. डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड घोटाळे, नेटबँकिंगशी संबंधित सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या गुरगावमधील आकाश नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला एक मेल आला की तो अश्लील व्हिडीओ पाहत आहे आणि CBI त्याच्या काही ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवत आहे. परंतु त्याच्या चतुराईमुळे त्याला लगेचच समजले की हा मेल एक स्कॅम आहे आणि त्यामुळे तो फसवणुकीपासून वाचला. पण असं काय केलं आणि आकाश कोणत्या सतर्कतेमुळे या स्कॅमपासून वाचला ते जाणून घेऊया.