

आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत, Xiaomi ने नवीन हँडसेट Redmi 10C लॉन्च केला आहे. फोन 4GB + 64GB आणि 4GB + 128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनमध्ये, कंपनी 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी यासारखे अनेक मस्त फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने नुकताच हा फोन नायजेरियात लॉन्च केला आहे. त्याच्या 64 GB व्हेरिएंटची किंमत $188 (सुमारे 14,400 रुपये) आणि 128 GB व्हेरिएंटची किंमत $209 (सुमारे 16 हजार रुपये) आहे. भारतात कंपनी लवकरच हा फोन Redmi 10 नावाने लॉन्च करू शकते.
Redmi 10C च्या फीचर आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6.71-इंचाचा LCD पॅनल देत आहे. हा डिस्प्ले एचडी + रिझोल्यूशन किंवा फुल एचडी + रिझोल्यूशनसह येतो याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. फोन 4 GB रॅम आणि 128 GB पर्यंत इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी, Redmi 10C मध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेऱ्यासह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन मायक्रो एसडी कार्ड सपोर्टसह येतो आणि 5000mAh बॅटरी सपोर्ट दिला आहे. ही बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
कंपनीने हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या तीन रंगांमध्ये लॉन्च केला आहे. फोनबद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही. अफवा अशी आहे की हा फोन Poco C4 म्हणून भारतात देखील लवकरच लॉंच केला जाऊ शकतो. हे भारतात या महिन्यात किंवा एप्रिलमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.