Redmi A1 Plus: रेडमीचा स्वस्तात मस्त फोन येतोय, किती असेल किंमत जाणून घ्या

Redmi A1 Plus will launch in india 14 october check specifications price here
Redmi A1 Plus will launch in india 14 october check specifications price here

Redmi India ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A1+ भारतात लॉन्च करण्याची तयारी केली आहे. तुम्हा नवीन फोन खरेदीचा विचार करत असाल तर हा फोन 14 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Redmi A1 च्या अपग्रेडेशनच्या टप्प्यावर Redmi A1+ ऑफर केला जात आहे. Redmi A1+ मध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट असेल. Redmi A1+ चा टीझर रिलीज करताना कंपनीने सांगितले आहे की हा फोन अनेक फीचर्सने सुसज्ज असेल. हा फोन सर्वप्रथम केनियामध्ये सादर करण्यात आला होता.

Redmi A1+ ची संभाव्य फीचर्स आणि किंमत

Redmi A1+ हे Redmi A1 प्रमाणेच मागील पॅनलवर लेदर टेक्सचर डिझाइनसह ऑफर केले जाईल. या फोनला मोठी स्क्रीन आणि मजबूत बॅटरी मिळेल. Redmi A1+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनी फोनच्या कॅमेऱ्यातही बदल करू शकते. फोनसोबत 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप मिळू शकतो.

त्याचबरोबर फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 64GB स्टोरेज सपोर्ट केले जाऊ शकते. फोनला 6.52-इंचाचा HD प्लस डिस्प्ले मिळेल, जो 60 Hz रिफ्रेश रेटसह येईल. Redmi A1+ सह 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने अद्याप फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. मात्र 8 ते 10 हजारांच्या सुरुवातीच्या किमतीत हा फोन लॉन्च केला जाईल असे मानले जात आहे.

Redmi A1 Plus will launch in india 14 october check specifications price here
Russia On Meta: रशियन सरकारकडून 'मेटा' दहशतवादी संघटना घोषित, केले गंभीर आरोप

Redmi A1 चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने मागील महिन्यातच Redmi A1 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. फोनसोबत प्री इंस्टॉल्ड एफएम रेडिओ देखील उपलब्ध आहे. Redmi A1 फिकट निळा, क्लासिक ब्लॅक आणि लाइट ग्रीन अशा तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. Redmi A1 सह MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि Android 12 Go Edition उपलब्ध आहे.

फोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज मिळतो जे मेमरी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. Redmi A1 सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 8 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स AI आहे. Redmi A1 च्या पुढील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi A1 Plus will launch in india 14 october check specifications price here
Devendra Fadanvis: समान नागरी कायदा आला पहिजे का?पाटेकरांच्या प्रश्नाला फडणीसांचं थेट उत्तर, म्हणाले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com