Redmi Note 14 Discount : खुशखबर! Redmi Note 14 मोबाईलवर बंपर डिस्काउंट; किंमत फक्त 11 हजार, इथे सुरुय ऑफर

Redmi Note 14 smartphone Discount Offer : सध्या Redmi Note 14 स्मार्टफोनवर आता 8 हजारचा बंपर डिस्काउंट मिळत आहे. हा फोन फक्त 11 हजारमध्ये कुठे उपलब्ध आहे, जाणून घ्या
Redmi Note 14 smartphone Amazon Discount Offer
Redmi Note 14 smartphone Amazon Discount Offeresakal
Updated on

Mobile Discount Offers : जर तुम्ही एक परवडणारा पण दमदार स्मार्टफोन घेण्याच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Redmi Note 14 या लोकप्रिय स्मार्टफोनवर सध्या जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन आता फक्त 11 हजारमध्ये उपलब्ध आहे, जो त्याच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल 8 हजारने कमी आहे. ही ऑफर Amazon या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरु असून खरेदीस इच्छुक असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Redmi Note 14 हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. त्याची 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेली बेस व्हेरिएंट लाँचवेळी 18,999 मध्ये मिळत होती. सध्या तीच व्हेरिएंट Amazon वर 16,999 मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी 1000 ची अतिरिक्त सूट सुद्धा दिली जात आहे.

तुम्ही जर जुना स्मार्टफोन एक्सचेंज करणार असाल, तर त्यावरही मोठी सवलत मिळू शकते. Amazon प्लॅटफॉर्मवर 16,149 पर्यंतचा एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. उदाहरणार्थ जर तुमच्या जुन्या फोनची किंमत 5 हजार इतकी असली, तर नवीन Redmi Note 14 तुम्हाला फक्त 10,999 मध्ये मिळू शकतो. मात्र एक्सचेंजची अंतिम रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Redmi Note 14 smartphone Amazon Discount Offer
Elon Musk Father : जगातील सर्वांत श्रीमंत माणसाचे वडील आले भारत दौऱ्यावर; कोण आहेत एरॉल मस्क?

Redmi Note 14 चे खास फीचर्स

Redmi Note 14 मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स आहेत

  • 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले, Full HD+ रेझोल्युशनसह

  • 120Hz रिफ्रेश रेट – स्क्रोलिंग आणि गेमिंग अधिक स्मूथ

  • MediaTek Dimensity 7025 Ultra प्रोसेसर

  • 6GB आणि 8GB RAM, तसेच 128GB/256GB स्टोरेज व्हेरिएंट

  • 50MP मुख्य कॅमेरा (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा

  • 16MP सेल्फी कॅमेरा

  • 5,110mAh बॅटरी

  • 45W फास्ट चार्जिंग

Redmi Note 14 smartphone Amazon Discount Offer
Viral Video : भारतीय कॉमेडियनने पाकिस्तानी माणसाला म्हणायला लावली हनुमान चालीसा, पाहा व्हायरल व्हिडिओ..

कोणासाठी आहे ही ऑफर योग्य?

  • ज्यांना 12 हजारच्या आत दमदार स्मार्टफोन हवा आहे

  • ज्यांना छान कॅमेरा आणि OLED डिस्प्ले असलेला फोन हवा आहे

  • जुना फोन बदलून नवा फोन घ्यायचा आहे आणि बजेटमध्ये चांगला पर्याय शोधत आहेत

कुठे आणि कसा खरेदी करावा?

Redmi Note 14 वर चालू असलेली ही ऑफर Amazon वर उपलब्ध आहे. बँक ऑफर्स, एक्सचेंज डील्स आणि EMI पर्याय देखील ग्राहकांसाठी खुले आहेत. मात्र स्टॉक मर्यादित असण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर खरेदी करणे योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com