Elon Musk Father : जगातील सर्वांत श्रीमंत माणसाचे वडील आले भारत दौऱ्यावर; कोण आहेत एरॉल मस्क?

Errol Musk India Visit : एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क भारतात त्यांच्या पहिल्या दौऱ्यावर आले आहेत. ग्रीन एनर्जी क्षेत्रात सहभागासाठी त्यांनी सर्वोटेकच्या सल्लागार मंडळात प्रवेश केला आहे.
Errol Musk India Visit
Errol Musk India Visitesakal
Updated on

Errol Musk in India Update : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांचे वडील, एरॉल मस्क सध्या त्यांच्या पहिल्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या या अनपेक्षित भेटीने उद्योग आणि सरकारी वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. ७९ वर्षीय दक्षिण आफ्रिकन उद्योजक आणि इंजिनीअर, नुकतेच एनएसई सूचीबद्ध 'सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स' या ग्रीन एनर्जी कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’वर नियुक्त झाले आहेत.

भारत दौऱ्याचा उद्देश

एरॉल मस्क यांचा एक आठवड्याचा भारत दौरा हा पूर्णतः ग्रीन एनर्जीशी संबंधित आहे. या काळात ते सर्वोटेक पॉवर सिस्टिम्सच्या उत्पादन युनिटला भेट देतील, विविध केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करतील तसेच भारतातील अग्रगण्य तंत्रज्ञांशीही बैठक करणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मस्क यांचे अनुभव आणि जागतिक दृष्टिकोन भारतातील हरित ऊर्जा प्रकल्पांना चालना देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कोण आहेत एरॉल मस्क? ( Who is Errol Musk)

एरॉल मस्क यांचा जन्म १९४६ साली दक्षिण आफ्रिकेत झाला. ते एक अनुभवी इंजिनीअर असून त्यांना इलेक्ट्रोमेकॅनिक्समध्ये विशेष ज्ञान आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबाईल रिटेल आणि खाण उद्योगात विविध महत्वाचे प्रकल्प हाताळले आहेत. त्यांनी एकेकाळी प्रिटोरिया शहराच्या नगरपालिकेवर सदस्य म्हणून देखील कार्य केले होते. ते प्रोग्रेसिव्ह फेडरल पार्टीचे सदस्य होते, जो त्या काळातील एक प्रभावी राजकीय पक्ष होता.

एरॉल यांचे इलॉन मस्क यांच्याशी संबंध गुंतागुंतीचे असल्याचे ते स्वतःच सांगतात. त्यांची पूर्व पत्नी मये मस्क यांच्याशी १९७० ते १९७९ या कालावधीत विवाह झाला होता.

Errol Musk India Visit
Spam Call Block : मिनिटांत कायमचे बंद करा फसवे स्पॅम कॉल; तुमच्या मोबाईलमध्ये लपलेलं 'हे' फीचर वापरून बघाच

सर्वोटेक पॉवर सिस्टिम्स ही कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि सौर ऊर्जा सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करते. एरॉल मस्क यांच्या सल्ल्यानुसार कंपनी आपल्या तांत्रिक व धोरणात्मक दृष्टीकोनात नवीन दिशा शोधणार आहे. त्यांच्या सहभागाने कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या योजनांना गती मिळण्याची शक्यता आहे.

एरॉल मस्क सोशल मीडियाद्वारे ब्रँडचा प्रचार देखील करणार आहेत. त्यांच्या या दौर्‍यात अयोध्येतील राम मंदिरालाही भेट देण्याचे नियोजन असून त्यामुळे ते भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेणार आहेत.

Errol Musk India Visit
Vivo S30 आणि S30 Pro Mini स्मार्टफोनची दमदार एंट्री; सुपर फीचर्स अन् आकर्षक डिझाईन, किंमत फक्त..

मस्क कुटुंबाची भारताशी वाढती जवळीक

याआधी एरॉल मस्क यांची पूर्व पत्नी व इलॉन मस्क यांची आई मये मस्क एप्रिल महिन्यात मुंबईत आल्या होत्या. त्यांनी आपल्या आत्मचरित्राच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन एनएमएसीसी (NMACC) या भव्य समारंभात केले होते.

एरॉल मस्क यांचा भारत दौरा केवळ औपचारिक न राहता भारतातील ग्रीन एनर्जी क्षेत्रात संभाव्य भागीदारी, गुंतवणूक आणि जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या भेटीमुळे भारतातील नवउद्योग व पर्यावरणस्नेही प्रकल्पांना नवा पाठिंबा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com