
Viral Video : भारतीय स्टँडअप कॉमेडियन गौरव गुप्ता सध्या आपल्या यूएस-कॅनडा टूरमध्ये धुमाकूळ घालतोय. या दौऱ्यातील एका शोमध्ये घडलेला प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही गौरव आणि एका पाकिस्तानी प्रेक्षक यांच्यात झालेली ही हलकीफुलका विनोद नेटकऱ्यांना भुरळ घालत आहे.
गौरव गुप्ताच्या लाईव्ह शोदरम्यान प्रेक्षकांपैकी एकाने स्वत:ची ओळख "पाकिस्तानी" म्हणून दिली. इतक्यातच संपूर्ण सभागृहात "सिंदूर! सिंदूर!" अशा घोषणा उमटल्या. या घोषणा नुकत्याच पार पडलेल्या भारतीय लष्करी 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित होत्या. शोमध्ये अचानक आलेल्या या वळणावर गौरवने प्रसंगाचं गांभीर्य ओळखत प्रेक्षकांना शांत राहण्याचं विनोदात सांगितलं आणि पुढे त्या पाकिस्तानी प्रेक्षकाला मिश्कीलपणे म्हणाला, "चला, आता हनुमान चालीसा वाचा! वाचा, वाचा!"
यावर संपूर्ण हॉलमध्ये हशा पिकला आणि त्या पाकिस्तानी प्रेक्षकानेही हा विनोद आनंदाने स्वीकारला.
(Comedian Gaurav Gupta Pakistani Fan Hanuman Chalisa Funny Video)
गौरवने संवाद पुढे नेत त्याला विचारलं, "तुला माझे विनोद समजतात का?" प्रेक्षकाने होकार दिल्यावर गौरवने खिल्ली उडवत म्हणालं, "तुला समजत नाही, नाही मिळणार तुला! इतकं वर्षं सांगतोय, नाही मिळणार, नाही मिळणार, पण तुम्ही परत यालच!" या विधानाने उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा वर्षाव केला. हे वक्तव्य काश्मीर मुद्याशी अप्रत्यक्षपणे जोडले जात आहे.
त्यानंतर गौरवने थोडं सौम्य होत त्या प्रेक्षकाचं कौतुक करत म्हटलं, "भाऊ, हिंमत आहे तुझ्यात इकडे येण्याची! त्याला वाटलं कलाकारांवर बंदी आहे, पण प्रेक्षक तर चालतात!" या वाक्याने पुन्हा एकदा वातावरणात हास्य पसरलं.
हा व्हिडीओ गौरव गुप्ताच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून काही तासांतच तो व्हायरल झाला. देशांमध्ये तणावाचं वातावरण असतानाही हास्याच्या माध्यमातून असा संवाद साधणं ही दुर्मीळ गोष्ट असल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे.
या प्रसंगाच्या निमित्ताने भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक बंधनांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सध्या पाकिस्तानी कलाकार भारतात परफॉर्म करू शकत नाहीत आणि भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही पाकिस्तानी कंटेंट हटवण्यात आला आहे. काही पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही भारतात बंदी घातली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.