कमालच झाली! Jio अवघ्या १ रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे हाय-स्पीड डेटा, जाणून घ्या भन्नाट ऑफर | Recharge Plan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio

Recharge Plan: कमालच झाली! Jio अवघ्या १ रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे हाय-स्पीड डेटा, जाणून घ्या भन्नाट ऑफर

Reliance Jio Cheapest Recharge Plan: खासगी टेलिकॉम कंपनी Jio च्या पोर्टफोलियोमध्ये अनेक स्वस्त प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी १०० रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंतचे प्लॅन्स ऑफर करते. मात्र, तुम्हाला कंपनीच्या १ रुपयांच्या रिचार्जबद्दल माहितीये का ? जिओने एका खास ऑफरची घोषणा केली आहे. या अंतर्गत अवघ्या १ रुपयात १ जीबी डेटा मिळेल. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Jio ची ही ऑफर ठराविक कालावधीसाठीच आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही केवळ १ रुपयात १ जीबी डेटाचे वाउचर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: National Consumer Rights day 2022: ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झालीये? 'या' क्रमांकावर करा तक्रार

Jio ची खास ऑफर

जिओच्या या खास ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला जिओ केअरच्या अधिकृत नंबरवर मेसेज करावा लागेल. तुम्हाला ७०००७७०००७ या क्रमांकावर Jio Sim Recharge मेसेज करावा लागेल.

मेसेज केल्यावर तुम्हाला जिओकडून रिप्लाय येईल. त्यानंतर तुम्हाला Recharge For a Friend पर्याय निवडावा लागेल.

पुढे ज्या जिओ नंबरवर रिचार्ज करायचा आहे, तो नंबर पाठवावा लागेल. तुम्ही तुमचा अथवा इतर यूजरचा नंबर पाठवू शकता. नंबर पाठवल्यानंतर स्क्रीनवर जिओची १ रुपयांची ऑफर आणि इतर प्लॅन्सच्या लिस्टचा मेसेज येईल. येथून तुम्ही १ रुपयात १ जीबी डेटा वाउचर खरेदी करू शकता. परंतु, यासाठी तुम्हाला WhatsApp Pay वरून पेमेंट करावे लागेल.

हेही वाचा: Christmas Stickers: हटके WhatsApp स्टिकर्सद्वारे मित्र-मैत्रिणींना द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, पाहा प्रोसेस

WhatsApp Payment सेटअपची प्रोसेस

WhatsApp Payment सेटअपसाठी तुम्हाला कोणत्याही चॅटवर जाऊन रुपयाच्या चिन्हावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर तुम्ही थेट व्हॉट्सअ‍ॅप पे सेटअप पेजवर रिडायरेक्ट व्हाल. आता Accept and Continue वर क्लिक करून बँक सिलेक्ट करा.

लक्षात घ्या की तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि बँक अकाउंटशी लिंक असलेला मोबाइल नंबर एकच असायला हवा. व्हेरिफिकेशनसाठी WhatsApp मेसेज पाठवे. सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही WhatsApp च्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

टॅग्स :Jiorechargemega recharge